Posts

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

Image
पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू! पोलिसांनी मनाशी निश्चित केले तर ते काहीही करू शकतात. गुन्हेगाराला शोधणे असो कि सर्वसामान्यांना न्याय देणे असो.. पोलीस सर्वच करू शकतात. नुकतेच जळगाव शहरात घडलेल्या दोन घटनांमध्ये याचा फार जवळून प्रत्यय आला पण त्यासाठी पोलिसांशी असलेले जवळचे संबंध देखील कारणीभूत ठरले. पोलिसात प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने जुगाड हवा हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.  जळगाव शहरातून २५ दिवसापूर्वी एक महिला आपल्या दोन चिमुकल्यांसह बेपत्ता झाली. नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून नोंद केली. तपासी अंमलदाराने तपास सुरु केला मात्र तो काही वेळेपुरते मर्यादित ठरला. पाच दिवस उलटले तरी महिलेचा तपास लागत नव्हता. मोबाईल बंद, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही दिसत नव्हते. नातेवाईक हतबल झाले. एक दिवस अगोदरच घरात भांडण झाले होते. संतापात चुकीचे पाऊल तर उचलले नसेल अशी शंका मनात येत होती. नातेवाईकांनी अजमेर, सुरत, जालना, बऱ्हाणपूर, रावेर, जामनेर, जळगाव, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार असे हजारो किलोमीटरचे अंतर शोधाशोध करीत पालथे घातले.  सर्व बाजूने निरा...

पत्रकारांच्या मनोरंजनाचा नवा अध्याय.. पत्रकार प्रीमिअर लीग!

Image
पत्रकारांच्या मनोरंजनाचा नवा अध्याय.. पत्रकार प्रीमिअर लीग! चेतन वाणी : पत्रकार हा समाजासाठी नेहमीच झटत असतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची आजची परिस्थिती लक्षात घेता तुटपुंज्या वेतनात डोंगराएवढ्या बातम्यांच्या मागे धावावे लागते. स्वतःचे आयुष्य आणि आरोग्य हरवत चालेल्या पत्रकारांच्या मनात मनोरंजनाचा नवीन किरण जागरूक करण्यासाठी नुकतेच पार पडलेला नवीन अध्याय म्हणजे पत्रकार प्रीमिअर लीग. महाराष्ट्रात प्रथमच जळगाव जिल्ह्यात पत्रकार प्रीमिअर लीगचे  गुंफले गेले. भल्याभल्यांना सहा महिने मेहनत घेऊन देखील  शक्य होत नाही असे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पार पाडले. पहाटे ४ वाजता घरी पोहचून आज सकाळी १२ वाजता पुन्हा पत्रकार परिषदेला उपस्थित राहणे हेच पत्रकारांचे आयुष्य.  पत्रकार प्रीमिअर लीग पर्व-१. क्रिकेट प्रीमिअर लीग म्हणजे आमच्यासाठी नवखा विषय. साधारतः १०-१२ वर्षांपूर्वी जैन उद्योग समूहतर्फे पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जायच्या त्या मला ठाऊक होत्या मात्र तेव्हा फक्त खेळायला जाणे आणि आनंद लुटणे इतकेच होते. यंदा स्पर्धेच्या पहिल्या पर्वाची संकल...

राजकीय नेता नव्हे सच्चा मार्गदर्शक मित्र ‘अनिलभाऊ चौधरी’

Image
राजकीय नेता नव्हे सच्चा मार्गदर्शक मित्र ‘अनिलभाऊ चौधरी’ चेतन वाणी : भुसावळ नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस. अनिल म्हणजे ध्यानी, मनी, सर्वस्वी.. स्वार्थ, कपट, दुजाभाव ‘नील’ ठेवणारे अद्वितीय व्यक्तिमत्व. लहान असो की वृद्ध एकदा त्यांच्या संपर्कात आला की त्यांचा फॅन झाला. कुणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होतो त्यामागे कारणे देखील डझनभर आहेत त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कधीही कुणालाही अंतर देत नाही. आजच्या या मंगलदिनी आपले प्रिय नेता, समाजसेवेसाठी अर्पित असलेली एक प्रेरणादायी व्यक्ती, आपल्या जीवनाचा आणखी एक सुवर्ण क्षण साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेताना त्यांच्या कार्याची महती पुन्हा अधोरेखित करणे महत्त्वाचे ठरते. अनिल चौधरी नावातच एक जादू आहे. समाजात त्यांच्याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत मात्र जोपर्यंत आपण त्यांच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा. अनिल चौधरी हे नाव मी जवळपास २० वर्षापासून ऐकतोय पण प्रत्यक्षात त्यांच्याशी जवळून ...

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

Image
पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग, आदरातिथ्याने सर्वच खूश  चेतन वाणी - देशभरात लाडक्या बाप्पाची स्थापना झाली असून सर्वत्र प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या देखील घरी गणरायाची स्थापना झाली आहे. पोलीस अधिक्षकांच्या अभय बंगल्यातील मुख्य हॉलमध्ये अतिशय आकर्षक सजावट करुन बाप्पा विराजमान आहेत. साहेबांच्या बंगल्याचा परिसर म्हणजे नयनरम्य ऐतिहासिक ठिकाण. सर्वत्र हिरवळ, दाट झाडी, झुडपातून जाणारा रस्ता, इंग्रजांच्या काळातील उत्कृष्ट संरचना असलेली दगडी आणि लाकडी इमारत. इथंच विराजमान आहे दिड फुटाची लहानशी बाप्पाची मूर्ती. पोलीस अधीक्षक दक्षिणेतील असल्याने इंग्रजी, मराठी, हिंदी आणि केरळी भाषेचे मिश्रण त्यांच्या बोलीत असते. जळगावच्या सर्वसामान्य जनतेत ते फारसे मिसळले नसल्याने बोली आणि स्वभाव अजून फारसा सैल नाही. पोलीस अधिक्षकांच्या बोलीमुळे बऱ्याचदा त्यांचा स्वभाव ओळखण्यात अनेकांची गफलत होते. तसा माणूस म्हणजे ते फार सरळ फक्त समजायला थोडा वेळ द्यावा लागतो. एकदा तुमची टोनिंग जमली की मग अगदी दिलखुलास गप्पा होऊ शकतात. सध्य...

गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम

Image
गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम        चेतन वाणी - वैश्यवाणी समाज तसे बघायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक. मुंबई, कोकण, गोवा परिसरात तसे समाजाची बरीच घरे आहेत मात्र त्यांचा इकडे संपर्क तोडकाच. खान्देश पट्ट्यात आमच्या समाजातील जुन्या मंडळींनी समाजाच्या एकत्रिकरण आणि प्रगतीसाठी बरेच प्रयत्न केले. वडिलधाऱ्यांची मेहनत म्हणूनच आज काही मंडळी चांगल्या पदावर आहेत.        मी लहान असताना आमच्या समाजात जळगाव जिल्ह्यात मोठा गुणगौरव सोहळा पार पडत होता. समाजाने अनेक वर्ष हा उपक्रम राबवला मात्र कालांतराने दुसरी पिढी समाजकार्यात पुढे सरसावली नाही आणि अनेक उपक्रम बंद झाले. सध्या तर समाज संघटन दूरच राहिले तरुणाई राजकारण, देश आणि धर्माच्या गोष्टी करतात, जेव्हा की अगोदर आपले संघटन मजबूत असेल तर धर्म आणि राष्ट्र मजबूत होईल हे त्यांना कळत नाही, किंबहुना ते त्यांना समजून घ्यायचे नाही.        विषयांतर नको.. समाजातील गुणवंतांचा गुणगौरव व्हायलाच हवा असा एक विचार यंदा पुन्हा पुढे आला. विचार आला खरा पण त्याला ...

पोलीसदलातील बाप माणूस ‘किसनराव नजन-पाटील’

Image
पोलीसदलातील बाप माणूस ‘किसनराव नजन-पाटील’ चेतन वाणी - पोलीस प्रशासन आणि माझं नाते तसे फार जुने नव्हे पण फक्त १४ वर्षांचे आहे. पोलीसदलात आजवर अनेक अधिकारी आले आणि गेले, संबंध सर्वांशी जोपासले मात्र मोजकेच जवळचे झाले. पोलीसदलात अधिकारी काही वर्षच संपर्कात येतात पण काही कायम घर करुन जातात. क्राईम रिपोर्टर म्हणून एलसीबी निरीक्षकाशी नेहमी संबंध येतो. जळगाव एलसीबीच्या बाबतीत बोलायचं झाले तर १४ वर्षापूर्वी भेटलेले निरीक्षक डी.डी.गवारे साहेब आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेले किसनराव नजन-पाटील साहेब दोघं बाप माणूस. जळगाव जिल्ह्यात १४ वर्षापासून क्राईम रिपोर्टिंग करताना अनेक वरिष्ठ अधिकारी आले आणि गेले. विशेषतः आयपीएस अधिकारी २-३ वर्षासाठी येऊन कर्तव्य निभावून गेले. जवळपास प्रत्येकाशी आजही संबंध कायम आहेत. आयपीएस अधिकारी क्वचितच पुन्हा परिक्षेत्रात येतात मात्र निरीक्षक पुन्हा-पुन्हा प्रदक्षिणा घालून वळणावळणावर भेटतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असला तरी पोलीस-पत्रकार एकाच गाडीची दोन चाके असल्याने जुळवूनच घ्यावे लागते. तसे वाद घालणे स्वभाव नसल्याने ते आपसूकच जुळते. तिसऱ्या वर्गातील पहिले अधिकारी पोलीस ...

पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS)

Image
पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS) चेतन वाणी -  एखाद्या पत्रकाराने पोलिसाचे कौतुक करणे म्हणजे नवलच.. गावभरात पोलिसांविषयी ओरड होत असतांना आपण एखाद्या अधिकाऱ्याचे कौतूक करणे म्हणजे दुखावलेल्या आत्म्यांच्या आगीत तेल ओतण्यासारखेच काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत जळगाव जिल्हा तसा नशीबवानच ठरला आहे. जिल्ह्याला एक तपापासून लाभलेले जवळपास सर्वच अधिकारी एखादे व्यक्तिमत्व सोडले तर सर्वच चांगलेच होते. विशेषतः पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेच्या मनात निर्माण केलेली जागा एका मित्रापेक्षा कमी नाहीच.      जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचा एक तपाचा नामफलक पाहिला तर महाराष्ट्रीयन आणि दक्षिणेतील अधिकारी असा संमिश्र राहिला आहे. गेल्या बारा वर्षात जिल्ह्याने ७ पोलीस अधीक्षक पाहिले. कुणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लकी ठरले तर कुणी पोलिसांनाच खाक्या दाखविला. कोरोना काळात लाभलेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे हे बहुतांश काळ जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. अनेक कार्...

गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे..

Image
गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे.. चेतन वाणी - जळगाव शहर, सुशिक्षित कुटुंबीय, भले मोठे मन आणि भले मोठे घर.. प्राणीमात्रांवर दया दाखविताना कर्णासारखे उदार मन ठेवणाऱ्या भुसारी कुटुंबियांनी गौसेवेचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे. २० गाय-वासरू, ५० कुत्र्यांना आपल्या अंगणात, घरात आणि थेट किचन, बेडरूममध्ये मुक्त संचार करू देणाऱ्या भुसारी कुटुंबाची एक आगळीवेगळी कहाणी, विचार ऐकल्यास आपल्याला देखील गौसेवेचा मोह आवरल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कलियुगात देखील असे कुणी असावे हे आश्चर्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया.. भारतात आणि विशेषतः हिंदू धर्मीयांमध्ये गायीला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे. समाजात फार पूर्वीपासून गाईचे महत्व अनमोल राहिले आहे. गाईपासून मिळणारे गोमुत्र, दूध, शेण सर्वच मनुष्य आणि निसर्गासाठी प्रचंड फायदेशीर आहे. कलियुगात गोहत्येचे प्रमाण वाढले आणि अनेक ठिकाणी कत्तलखाने सुरु झाले. भाजप सरकारच्या काळात गोरक्षणार्थ कायदा तयार झाला. कायद्याच्या अनुषंगाने गो हत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी आजही ते शक्य झालेले नाही. काळानुरूप गौसेवेचे महत्व ...

‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च..

Image
‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च.. चेतन वाणी - जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची परीक्षा पाहणारा आजवरचा सर्वात मोठा सोहळा नुकतेच पार पडला तो म्हणजे वडनगरी शिवारातील पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळा. कथेच्या निमित्ताने भक्तीचा जागर झाला, लाखो भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले, रात्रीची कडाक्याची थंडी, दिवसाचे ऊन सहन करीत भाविकांनी कथेचा लाभ घेतला. भाविकांच्या सेवेसाठी हजारो सेवेकऱ्यांनी सेवा बजावली मात्र खरे सेवेकरी होते ते पोलीस. तहान, भूक विसरून, पुरेशी झोप न घेता दिवसभर रस्त्यावर उभे राहून पोलिसांनी बजावलेल्या चोख कर्तव्यामुळे शिवमहापुराण कथा सोहळा कायदा व सुव्यवस्था राखत पार पडला. एरव्ही सण, उत्सव वेशीवर टांगून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या शिस्त, माणुसकीचे रूप जळगावात पाहायला मिळाले.  प्रख्यात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी संपूर्ण देशातील भक्तांना ‘एक लोटा जल सारी समस्या का हल’ हा मंत्र देत भगवान भोले बाबाच्या भक्तीचा मार्ग दाखवला. देशभर सध्या पंडित प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्याच नावाचा बोलबाला आहे. जळगाव तालुक्यातील...

ट्रॉफीच नव्हे, मने जिंकणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार!

Image
ट्रॉफीच नव्हे, मने जिंकणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार! चेतन वाणी : जळगाव जिल्ह्यात नुकतेच नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. एरव्ही शिस्त आणि कायद्याच्या दृष्टीने कणखर असणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे दुसरेच रूप गेल्या ७ दिवसात ५ जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंनी पाहिले. जेव्हा पोलीस अधीक्षक स्वतः खेळाडू म्हणून सहभागी होतात तेव्हाच खेळाडूंना देखील उत्साह संचारतो आणि ते विजयश्री खेचून आणतात. जळगाव जिल्ह्यात विभागीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने 'न भूतो न भविष्यती' नियोजनाचा विडा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी उचलला. गेल्या २ महिन्यांपासून खेळाडूंशी होत असलेली चर्चा, मायक्रो नियोजनाने सर्व शक्य झाले आणि महिला व पुरुष दोन्ही गटात सर्व साधारण विजेतेपद जळगाव जिल्ह्याने मिळवले. शेवटच्या दिवशी समारोपीय कार्यक्रमात सर्वांना मनसोक्त मजा लुटता आली आणि जेवणाचा तृप्तीचा ढेकर देत सर्व आपल्या घरी मार्गस्थ झाले.  जळगाव एखादा पोलीस अधिकारी कधी पोलिसांसाठी चांगला असतो तर कधी फारच शिस्तीचा किंवा त्रासदायक ठरतो. जळगाव जिल्हा तसा गेल्या काही वर्षापासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत फार...

गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा!

Image
गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा चेतन वाणी : गणरायाचे आगमन म्हणजे सर्वत्र चैतन्य आणि सणासुदीची मांदियाळी आणणारा उत्सव. सामाजिक एकोपा जपणारा हा सोहळा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आनंददायी असतो.  गणेशोत्सवाच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पोलीस दलाची असल्याने ते जास्त सतर्क असतात. जळगाव जिल्ह्यात यंदा सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडले आणि ईद मिलाद देखील उत्साहात साजरे झाले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी ठरले. मुख्य म्हणजे संपूर्ण पोलीस दलात सिंहाचा वाटा राहिला तो जळगाव 'एलसीबी'चा. जळगाव जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा शहरात कोणतेही गालबोट न लागता गणेशोत्सव आणि ईद मिलाद शांततेत पार पडल्याचे हे कदाचित पहिलेच वर्ष असावे. मुख्यत्वे ग्रामीण भागात नियमात आणि पोलिसांच्या सूचनेप्रमाणे सर्व विसर्जन आणि जुलूस मिरवण्यात आले. जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा, चिनावल, अडावद, धानोरा, नशिराबाद, भुसावळ, वरणगाव, एरंडोल, पाळधी, अमळनेर, पाचोरा ह...

इन्सायडर स्टोरी : बाप तो बाप रहेगा..!

Image
इन्सायडर स्टोरी : बाप तो बाप रहेगा..! जळगाव जिल्ह्यात प्रथमच पोलीस, महसूल आणि आरटीओ विभागाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली. ५३ ट्रॅक्टर आणि १४ डंपर, ट्रक पथकाने बांभोरी गावातून ताब्यात घेतले. अतिशय गोपनीय पद्धतीने भल्या पहाटे यशस्वीरित्या पार पडलेल्या कारवाई मागे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे मायक्रो सिक्रेट प्लॅनिंग कारणीभूत आहे. पोलिसांनी कारवाई केली हे सर्वांना माहिती आहे मात्र का केली यामागील काही कारणे महत्त्वाची आहेत. कुणाच्याही दबावाला न जुमानता केलेल्या कारवाईमुळे जिल्हाभरातील वाळूमाफिया कमालीचे धास्तावले आहेत. जळगाव जिल्ह्यातील बरेच गावगुंड विशेषतः तरुण गेल्या काही वर्षात अवैध धंद्याच्या नादी लागले आहेत. सट्टा, पत्ता, जुगार, कुंटन खाना व्यवसायात आणि खास करून अवैध वाळू वाहतुकीच्या बळावर कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची सवय तरुणाईला लागली. झोपडपट्टी बहुल भागासह इतरही भागातील तरुण आणि प्रौढ यात उतरू लागले. सुरुवातीला मोजकेच असलेल्या गावगुंडांनी आपल्या गँग तयार केल्या. राजकारण्यांची साथ मिळू लागल्याने गुंड सुसाट झाले आणि त्यातच काही प्रशासकीय अधिकारी...

इनसायडर स्टोरी : डॉ.अश्विन सोनवणे यांचे उपोषण फसले का?

Image
इनसायडर स्टोरी : डॉ.अश्विन सोनवणे यांचे उपोषण फसले का? जळगाव शहराची अवस्था सर्वांनाच ठावूक आहे. गल्लोगल्ली रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून शहर खड्ड्यांनी भरले आहे. कचरा आणि अस्वच्छ गटारींनी परिसर व्यापले असतांना स्वच्छतेच्या नावाने लाखोंची बिले वर्ग केली जात आहे. ठराविक परिसरात विकासकामे होत असून इतरांना मात्र वाटाण्याच्या अक्षता दिल्या जात आहे. जळगाव शहरातील विकासकामांविषयी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाचे नेते संकटमोचक ना.गिरीश महाजन यांच्या कानावर देखील सोनवणे यांनी तो विषय घातला होता. डॉ.सोनवणे आपला हेतू घेऊन पुढे सरकत असतानाच काही लोकांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आपला हेतू साधला. शहरातील विकासकामांच्या मुद्द्यात आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा मुद्दा मुख्य करण्यात आला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी नगरसेवकांच्या नाकावर टिच्चून पुन्हा पदावर बसलेल्या डॉ.विद्या गायकवाड विरुद्ध डॉ.अश्विन सोनवणे असे चित्र रंगवण्यात आले. www.chetanwani.blogspot.com उपोषण सुरु झाले आणि विकासकामांच्या मुद्द्यावर डॉ.सो...

Viral Video : पोलिसांना खाजगी आयुष्य नाही का?

Image
समाजात वावरताना अनेक शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या नजरेस पडतात. अनेकदा आपला त्यांच्याशी संपर्क देखील येतो पण त्यात एक वर्ग नेहमीच ग्लॅमरस दुनियेत वर्गला जातो तो म्हणजे 'पोलीस'.... पोलीस हा समाजाचा असा भाग आहे की तो 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या रक्षणार्थ ऊन, पाऊस, थंडी, धूळ, वारा सहन करीत उभा असतो. पोलिसाला ना कुठला सण असतो ना कुटुंब, ना उत्सव, ना धर्म. इतकं सर्व करून देखील पोलिसांच्या वाट्याला येते काय तर बदनामी.  जळगाव जिल्ह्यात सध्या पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाळधी येथील एका ढाब्यावर काही पोलीस कर्मचारी मित्रांसोबत नाचताना व्हिडीओत दिसत आहे. मी घेतलेल्या माहितीनुसार तो व्हिडिओ साधारणतः ११ महिन्यापूर्वीचा असून पोलिसांच्या एका बॅचला २५ वर्ष पूर्ण झाल्याने तो स्नेह मेळावा (गेट टुगेदर) होते. मित्रांचा गोतावळा शहराबाहेर जमला आणि आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी टिमकीच्या तालावर येथेच्छ आनंद लुटला. पोलिसांनीच मोबाईलमध्ये शूटिंग केले आणि एकाने फितूरकी केली. गेल्या वर्षी देखील रेल्वे स्टेशनजवळ एका हॉटेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्...

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

Image
कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू' जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातील वातावरण गेल्या पंधरवड्यात पार ढवळून निघाले. मुख्यत्वे जातीय तणाव आणि दंगली उसळल्या, त्यातल्या तर गल्ली दादा जास्तच दबंगगिरी करू लागले. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पाहिले बोट उगारले जाते ते पोलिसांवर.. टीकेचा धनी पोलीसच होतो.. इतकंच काय तर सध्या दंगलीत पिळले जाणारे देखील पोलीसच.. अगोदर होता तसा खाकीचा दरारा राहिला नाही असे वाटू लागले असले तरी त्यामागे अनेक कारणे आहेत. मानव अधिकार आयोगाची नियमावली, संशयीत, गुन्हेगार, राजकारणी, अवैध धंदेवाल्यांचे वाढलेले प्रस्थ यामुळे सर्वच काही बदलले. सर्व काही असले तरी आजही गुन्हेगारांना वचक घालायला खाकी सक्षम आहे मात्र काही खाकीदार सक्षम नाही. विशेषतः नव्याने गेल्या १० वर्षात भरती झालेले अधिकारी आणि कर्मचारी. जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाची आणि सध्याच्या कायदा व सुव्यवस्था आणि गुन्ह्यांची परिस्थिती काही वेगळी नाही. सर्व काही सारखेच. स्थानिक प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी सक्षम ठरत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकार...