राजकीय नेता नव्हे सच्चा मार्गदर्शक मित्र ‘अनिलभाऊ चौधरी’
![]() |
राजकीय नेता नव्हे सच्चा मार्गदर्शक मित्र ‘अनिलभाऊ चौधरी’
चेतन वाणी : भुसावळ नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष आणि प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस. अनिल म्हणजे ध्यानी, मनी, सर्वस्वी.. स्वार्थ, कपट, दुजाभाव ‘नील’ ठेवणारे अद्वितीय व्यक्तिमत्व. लहान असो की वृद्ध एकदा त्यांच्या संपर्कात आला की त्यांचा फॅन झाला. कुणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होतो त्यामागे कारणे देखील डझनभर आहेत त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कधीही कुणालाही अंतर देत नाही.
आजच्या या मंगलदिनी आपले प्रिय नेता, समाजसेवेसाठी अर्पित असलेली एक प्रेरणादायी व्यक्ती, आपल्या जीवनाचा आणखी एक सुवर्ण क्षण साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेताना त्यांच्या कार्याची महती पुन्हा अधोरेखित करणे महत्त्वाचे ठरते.
अनिल चौधरी नावातच एक जादू आहे. समाजात त्यांच्याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत मात्र जोपर्यंत आपण त्यांच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा. अनिल चौधरी हे नाव मी जवळपास २० वर्षापासून ऐकतोय पण प्रत्यक्षात त्यांच्याशी जवळून संपर्क झाला तो ६-७ महिन्यांपूर्वी. एरव्ही एखादा नेता किंवा बडा व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आणि समजदार व्यक्तीला जवळ करत नाही मात्र अनिलभाऊंच्या दरबारी सर्व उलटच आहे.
..म्हणून हजारो चाहत्यांचा गोतावळा
जेव्हा तुम्ही अनिलभाऊंशी जुळतात तेव्हाच ते तुम्हाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात. कदाचित हेच कारण आहे की, मुख्य सत्तेपासून २० वर्ष लांब असून देखील हजारो चाहते, समर्थक, कार्यकर्ते त्यांच्याशी जुळून आहेत. अनिलभाऊ प्रत्येकाला नावानिशी ओळखतात आणि त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. कोणताही कार्यक्रम, उत्सव, सोहळा असो ते दुजाभाव न ठेवत कार्यकर्त्याला सोबत घेऊन बसतात. जेवण असो की शॉपींग सर्वांना एकसमान हे त्यांचे तत्व. स्वतः उपाशी राहतील मात्र सोबतच्या मंडळीचा विचार ते नेहमी अगोदर करतात. कोणत्याही मोठ्या नेत्याची भेट जरी घेतली तरी ते आपल्या कार्यकर्त्यांची ओळख करून देतात आणि त्याची स्पेशलिटी देखील त्यांना सांगतात. नेत्यांसोबत असताना देखील ते कार्यकर्त्यांना अंतर देत नाही.
अनेकांच्या आयुष्याची घडी बसवली
अनिलभाऊंच्या जीवनप्रवासात संघर्ष, आत्मविश्वास, आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम दिसतो. साध्या गरीब कुटुंबातून आलेल्या अनिलभाऊंनी समाजासाठी काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहिले. लहानपणापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेल्या नेतृत्वगुणांनी त्यांना इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करून दिली. जिद्द, मेहनत आणि समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली. अनिलभाऊंनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण समाजहितासाठी खर्च केला आहे. गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने उभारली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातसह सर्वच क्षेत्रात अनेकांना फायदा झाला. आजही हजारोंचे आयुष्य अनिलभाऊंच्या प्रयत्नामुळे उभे आहे.
साधेपण आणि जिव्हाळ्यामुळे हृदयात स्थान
लोकनेत्याचे खरे सामर्थ्य त्यांच्यावर असलेल्या सामान्य जनतेच्या विश्वासात आहे. त्यांच्या साधेपणामुळे आणि जिव्हाळ्यामुळे ते प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवतात. अनिलभाऊंच्या भेटीत लोकांना नेहमीच प्रेरणा, आश्वासन, आणि ऊर्जा मिळते. अनिलभाऊंना वाढदिवसानिमित्त, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, त्यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्याला आणखी उज्ज्वल भविष्याची वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करतो. त्यांच्या जीवनातून आपल्याला नेहमीच शिकायला मिळते की, जिथे संघर्ष असतो तिथेच विजयाची बीजे असतात. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा समाजासाठी एक आदर्श आहे.
“जगाचा प्रकाश होण्यासाठी एक ज्योत पुरेशी असते, आणि आज आपण अशाच एका ज्योतीचा वाढदिवस साजरा करत आहोत.”
अनिलभाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
चेतन अरुणा रविंद्र वाणी - 9823333119

Comments
Post a Comment