Posts

लफडेबाज कार्ट, डँशिंग गर्ल!

Image
लफडेबाज कार्ट, डँशिंग गर्ल!      भटक्याची भटकंती सुरु असतांना बाहेरगावी असलेल्या एका विवाहित मैत्रिणीचा फोन आला. कहा हो यार, मै जळगाव आयी हु, चलो मिलते है. गोलाणीच्या चहा कट्ट्यावर भेटायचं ठरलं. भटक्या पोहचला तिसर्‍या मजल्यावर.. चहाचा घोट घेत जुन्या आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात झाली. घरचे कसे, कुणी जुने मित्र भेटतात कि नाही अशा आपुलकीच्या गप्पा झाल्यावर आपल्या जरा वेगळ्या गप्पा रंगल्या. गप्पांची मैफिल ऐन रंगात आलेली असताना एक मुलगी मोठ्याने ओरडत असल्याचे ऐकू आले. एका घोटात चहा घशाखाली उतरवून भटक्याने मैत्रिणीसह तिकडे लक्ष दिले. गोलानीच्या स्पर्धा परीक्षा क्लासेसजवळ शायनिंग मारत जात असलेल्या एका टारगट कार्ट्यावर चांगलीच खेकसत होती. नीट लक्ष दिल्यावर लक्षात आले कि, त्या तरुणाने तिची छेड काढलेली असल्याने ती त्याच्यावर संताप करत होती. ओ... तुझ्या घरी आई-बहिणी नाही का?, इकडे का.... करायला आला. नीच, कुत्रा.. अशा शिव्यांची लाखोलीच ती वाहत होती.       पाहता पाहता बघ्यांची गर्दी जमू लागली. भर मार्केटमध्ये एक तरुणी तरुणाला चांगलाच धडा शिकवत असतांना ती केव्हा...

भटक्या.. on College Katta..

Image
      भटक्याची भटकंती सुरूच असते.. आज इथं तर उद्या तिथं.. रविवारी भटक्याचा फेरफटका मेहरूण तलावावर होता.. अबब.. फोटो शूट करणार्‍यांची जत्रा पाहून भटक्या अवाकच झाला. हे जंगी पार्टी. भटक्याची फटफटी पुढे गेली तर तरूणांच टोळकच बाटल्या ढोसलत बसलं होत. एक पेग घ्यायची इच्छा झाली पण.. तडक ऑन ड्युटी असल्याची जाणीव झाल्याने भटक्या मागे फिरला. कार्यालयात परतताना शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयाच्या समोरील कट्टयावर भटक्या पोहचला. हॉस्टेलच्या जुन्या पोरांनी आवाज मारला.. कारे भो, आडी कुडी आला, आज तर रविवार हे.. फटफटी लावून भटक्या  गप्पांच्या मैफिलीत सामील झाला.. भाऊ, आमच्या कॉलेजचा किस्सा समजला का? त्या पोरींनं दारू ढोसली ना.. रूमवर भी उशिरा आलत्या.. काय व्हई रायन, समझीच नही रायन्ह.. भटक्याच्या चौकशा लगेच सुरू झाल्या. काय झाले, कसं झाले. जरा नेंमन सांगत भो. अरे भाऊ, आमच्या इथल्या दोन मुलींना फोटो शुटची लई हौस. दोघी बी परवा मस्त पार्लरला गेल्या होत्या. झक्कास लूक करून फोटो शूट करायला गेल्या. दुपारच्या गेलेल्या त्या सायंकाळपर्यंत बाहेरच होत्या. बॉयफे्रंडसोबत नुसत्या बीयर ढोसलल्...

साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर

Image
साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर             तरसोद, नशिराबाद, मुराराखेडा(उजाळगाव), या तीन गावांच्या सिमेसमोर तरसोद शिवारात इ.स.1662 साली मोरेश्‍वर हणमंत देशमुख यांनी बांधलेल्या श्री क्षेत्र तरसोद गणपती मंदिर या जागृत देवस्थानाची पंचक्रोशीत ख्याती असून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी मंदिराला भेट देत असतात. प्रचाराचा नारळ वाहायचा असो की लग्नानंतरचे देवदर्शन असो जळगावकरांची पहिली वारी असते ती तरसोदच्या गणरायाच्या चरणी. असा आहे इतिहास  :            पद्मालयचे सिध्द पुरूष गोविंद महाराज व आळंदी देवीची येथील सिध्द पुरूष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तसेच नशिराबाद येथील शिव योगिराज झिपरू अण्णा महाराज हे मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी यायचे. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि नशिराबादचे परम पुज्य झिपरू अण्णा या तिघे महाविभूती नशिराबादच्या पश्‍चिमेला दोन कि.मी. अंतरावर असलेल्या ज्या चिंचेच्या महाकाय वृक्षाखाली असलेल्या गणपती मंदिराजवळ बसत तेच हे तरसोदच्या गणेशाचे मंदिर. शेगाव ये...

मनुष्या नको रे निर्दयी होवू..!

Image
भूतदया करा , प्राण्यांच्या भावनांची जाण ठेवा.                      ज नावरांप्रती माणुसकी दाखवा , प्राण्यांना होणाऱ्या त्रासाची जाण ठेवा. असे आपण बोलतो , ऐकतो मात्र खरंच तसं वागतो का ? काही दिवसांपूर्वी महामार्गावर वाहनांच्या चाकाखाली आल्याने चिरडलेले माकड , कुत्रा यांचे फोटो पाहिले. पाहताच क्षणी जिवाचा तळफळाट झाला. गेल्या आठवड्यातच एका माकडाला निर्दयीपणे मारत असलेल्या तिघांचा व्हिडीओ व्हायरल झाला , सर्वत्र संतापाची लाट उसळली. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांना अटक झाली , तेव्हा कुठे अनेकांच्या मनाला थोडी शांती लाभली. मनुष्य खरंच खूप निर्दयी होतोय का ? आज पुन्हा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.             आमच्या घराशेजारी असलेले एक कुटूंब शेतकरी आहे. त्यांच्याकडे असलेल्या दोन म्हशी घराजवळच बांधलेल्या असतात. काल परिसरातच राहणाऱ्या कुणीतरी घरातील खराब बुरशी लागलेले बुंदीचे लाडू एका म्हशीला खावू घातले. काही वेळातच म्हशीला त्रास होऊ लागला. बिचारी मूक प्राण...

दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!

Image
दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!      महाराष्ट्र शासनाने महिलांच्या विकासासाठी नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी २०११ पासून राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच पदभार स्विकारलेल्या अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी अवघ्या काही महिन्यातच अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या या अभियानाविषयी जागतिक महिला दिनानिम्मित आर.विमला यांच्याकडून जाणून घेवूया सविस्तर माहिती..! अभियानाचा मुख्य उद्देश आणि स्वरूप    २०११ मध्ये केंद्र शासनाने जे वंचित आहेत अशा गोरगरीब जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा त्यासाठी या अभियानाची स्थापना केली. एकट्याने कोणतेही कार्य हाती घेतल्यास ते लवकर शक्य होत नाही, असा विचार करीत जास्तीत जास्त संस्था निर्माण करण्यावर शासनाने भर दिला. केंद्र शासनाने पंचसूत्री तर राज्यशासनाने दशसुत्री कार्यक्रमाची आखणी केली. त्यानुसार महिलांना एकत्र आणणे, त्यांची बैठक घेणे, बचतीची सवय...

अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’

Image
अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’     बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास, वेळोवेळी मिळालेले धक्के, पदरी पडलेले नैराश्य यातून खचून न जाता स्वयंसिद्धा अभियानात आजवर लाखो मुलींना प्रशिक्षित करून स्वतःला सिद्ध करण्यायोग्य बनविणाऱ्या मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी कविता सुभाष नावंदे यांची ही यशकथा..!     कविता यांचे मूळ गाव आंबेजोगाई. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. घरात चार बहिणी, १ भाऊ असा परिवार. वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदलीमुळे परळी, पाटोदा, बीड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण  केले. वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण करताच लग्न झाले. बीपीएड, एमपीएडचे शिक्षण औरंगाबाद येथे घेतले. ‘ते’ सात दिवस पहिला संघर्ष     ८० च्या दशकात मुलींना फारसे शिक्षण घेऊ दिले जात नव्हते. कविता यांचे वडिल माणिकराव यांनी देखील त्यांना दहावीनंतर पुढे शिक्षण बंद असा आदेशच घरात दिला. आईने मस्का लावला, वडिलांच्या विनवण्या केल्या, मैत्रिणींच्या पालकांनी समजाविले परंतु ते काही ऐकत ...

*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*

Image
*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*           गेल्या अनेक वर्षांपासून कायम असलेली सेना-भाजप युती यावर्षी नाट्यमय घडामोडी होऊन तुटली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणाच केली. अवघे काही दिवस उलट नाही तोच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे वक्तव्य केले. केवळ आपलीच चर्चा मतदारांमध्ये रहावी या उद्देशाने भाजप-सेनेने भांडण केलं असल्याचे आता वाटतं आहे.      गेल्या चार महिन्यापासून राज्यात निवडणुकीची चर्चा सुरु आहे. चर्चा तर सर्व करताय पण कुणाची..? आठवण करून बघा जरा, कोणत्या पक्षाचं नाव येतं ओठांवर? भाजप आणि शिवसेना दोनच नाव लक्षात येतात. का तर, गावात ज्याची चर्चा, त्याचेच नाव ओठी असते. तशीच गंमत सध्या आपल्याकडे आहे. भाजप आणि सेना युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यातच त्यांचा दिवस जात होता. त्यामुळे कोणतीही वृत्तवाहिनी सुरु करा किंवा वृत्तपत्र वाचा दोनच नावे समोर भाजप आणि सेना. अगोदर युती कायम राहणार असे सुतोवाच करून ‘पहले तुम, पहले तुम’ करीत...