भटक्या.. on College Katta..

भटक्याची भटकंती सुरूच असते.. आज इथं तर उद्या तिथं.. रविवारी भटक्याचा फेरफटका मेहरूण तलावावर होता.. अबब.. फोटो शूट करणार्यांची जत्रा पाहून भटक्या अवाकच झाला. हे जंगी पार्टी. भटक्याची फटफटी पुढे गेली तर तरूणांच टोळकच बाटल्या ढोसलत बसलं होत. एक पेग घ्यायची इच्छा झाली पण.. तडक ऑन ड्युटी असल्याची जाणीव झाल्याने भटक्या मागे फिरला. कार्यालयात परतताना शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयाच्या समोरील कट्टयावर भटक्या पोहचला. हॉस्टेलच्या जुन्या पोरांनी आवाज मारला.. कारे भो, आडी कुडी आला, आज तर रविवार हे.. फटफटी लावून भटक्या गप्पांच्या मैफिलीत सामील झाला..
भाऊ, आमच्या कॉलेजचा किस्सा समजला का? त्या पोरींनं दारू ढोसली ना.. रूमवर भी उशिरा आलत्या.. काय व्हई रायन, समझीच नही रायन्ह.. भटक्याच्या चौकशा लगेच सुरू झाल्या. काय झाले, कसं झाले. जरा नेंमन सांगत भो. अरे भाऊ, आमच्या इथल्या दोन मुलींना फोटो शुटची लई हौस. दोघी बी परवा मस्त पार्लरला गेल्या होत्या. झक्कास लूक करून फोटो शूट करायला गेल्या. दुपारच्या गेलेल्या त्या सायंकाळपर्यंत बाहेरच होत्या. बॉयफे्रंडसोबत नुसत्या बीयर ढोसलल्या ना. फुल्ल फीट झाल्या अन् काय मग रूमवर यायचं कसं? घरी समजल तर वांधे व्हायचे, रूम पण जायचं. अस करता करता त्या रात्री 11 वाजता पोहचल्या रूमवर. बिल्डींगचा सुरक्षारक्षक तर गेटवर उभा ना भो, त्याने दिले हाकलून.. मुलींनी सॉरी म्हटलं, पाया पडल्या, पण तो ऐकूनच घेत नव्हता. मग बिल्डींगच्या बॉसला फोन लावला. त्याने लावला ना पोरींच्या घरी फोन.. दुसर्या राज्यातल्या पोरी असल्याने सकाळी येतो म्हणून बिचारे माय-बाप बोले. भटक्याने विचारले, सीसीटीव्ही फुटेज आहे का? हाव आहे ना. देईन उद्या म्हणून त्या पोराने उत्तर दिले.
रात्री 11.30 वाजता पोरी रूमवर गेल्या. दुसर्या दिवशी माय-बाप आले ना रूमवर. बॉसने सर्व सांगितले. पोरी तर लई हुश्शार ना.. स्टोरीच बनवली. थोडा इमोशनली टच. आई, मावशी.. आम्ही मेकअपसाठी पार्लरला गेलो. तिथं त्यांनी कॉम्प्लिीमेंटरी कोल्ड्रींग पाजली. मग ना आम्हाला काहीच सुचलं नाही. डायरेक्ट सायंकाळीच जाग आली. आम्हाला अस वाटतयं त्यांनीच काहीतरी केलंय. आई-वडीलांसमोर मोठं संकट उभं राहिले. तक्रार करावी तर कुणाची.. आपल्या पोरींची, रूम प्रमुख की महाविद्यालय.. शेवटी सर्वांनी समजदारीची भुमिका घेतली. आपल्या पोरींची चूक असल्याचे पालकांच्या लक्षात आले.
पोलिसात मॅटर जायच्या अगोदरच सर्व सेट झालं. भटक्याला मस्त स्टोरी भेटली, पण पोरींच्या करीयरचा विचार करता, त्याने काहीही वाच्यता न करण्याचा निर्णय घेतला. आजच्या पोरी भी काय राव.. दारू बी पेता अन् लोकाले भी बदनाम करता.. स्वतःची सुरक्षा स्वतःच करायला लावा. असा सल्ला त्या पोरांकडे भटक्याने दिला अन् निघाला ऑफीसला..!
Comments
Post a Comment