लफडेबाज कार्ट, डँशिंग गर्ल!


लफडेबाज कार्ट, डँशिंग गर्ल!

     भटक्याची भटकंती सुरु असतांना बाहेरगावी असलेल्या एका विवाहित मैत्रिणीचा फोन आला. कहा हो यार, मै जळगाव आयी हु, चलो मिलते है. गोलाणीच्या चहा कट्ट्यावर भेटायचं ठरलं. भटक्या पोहचला तिसर्‍या मजल्यावर.. चहाचा घोट घेत जुन्या आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात झाली. घरचे कसे, कुणी जुने मित्र भेटतात कि नाही अशा आपुलकीच्या गप्पा झाल्यावर आपल्या जरा वेगळ्या गप्पा रंगल्या. गप्पांची मैफिल ऐन रंगात आलेली असताना एक मुलगी मोठ्याने ओरडत असल्याचे ऐकू आले. एका घोटात चहा घशाखाली उतरवून भटक्याने मैत्रिणीसह तिकडे लक्ष दिले. गोलानीच्या स्पर्धा परीक्षा क्लासेसजवळ शायनिंग मारत जात असलेल्या एका टारगट कार्ट्यावर चांगलीच खेकसत होती. नीट लक्ष दिल्यावर लक्षात आले कि, त्या तरुणाने तिची छेड काढलेली असल्याने ती त्याच्यावर संताप करत होती. ओ... तुझ्या घरी आई-बहिणी नाही का?, इकडे का.... करायला आला. नीच, कुत्रा.. अशा शिव्यांची लाखोलीच ती वाहत होती.
      पाहता पाहता बघ्यांची गर्दी जमू लागली. भर मार्केटमध्ये एक तरुणी तरुणाला चांगलाच धडा शिकवत असतांना ती केव्हा त्याला मारेल हीच वाट सर्व पाहत होते. भटक्या देखील मैत्रिणीसह लांबूनच गंमत पाहत होता. लफडेबाज तरुणावर संताप करणार्‍या तरुणीने अचानक यू टर्न मारला. काय तोंड ताणताय, पोरग्या पोरची नाव घेतो आणि तुम्ही मजा बघता लाज नाही वाटत का? माणसासारखे माणसा आहे ना, नसेल तर हातात बांगड्या घालून फिरा. तरुणीचा संताप स्वाभाविक होता. बघ्यांना अपेक्षित नसलेला टोला तिने लगावला होता. आपल्या इज्जतीचे धिंडवडे निघाण्यापेक्षा काढता पाय घेणे अनेकांना सोयीस्कर वाटले. अर्धी गर्दी सरल्यावर तरुणीने देखील तरुणाला जावू दिले. भर मार्केटमध्ये दुपारच्या सुमारास झालेल्या प्रकारामुळे देशात छेडखानीचे प्रकार वाढतच असून तरुणींनी देखील झाशीच्या राणीचे रूप घेणे गरजेचे असल्याचे ठाम मत भटक्याने केले. डोळ्यासमोर झालेल्या प्रकारावर चर्चा करण्यात भटक्या आणि मैत्रिणीचा पुढील तासभर कसा गेला ते कळलेच नाही. गप्पांमध्ये कठुआपासून निर्भयापर्यंत व्हाया कोपर्डी अशा अनेक विषयांवर विचारमंथन देखील झाले.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'