Posts

मनुष्या नको रे निर्दयी होवू..!

Image
भूतदया करा , प्राण्यांच्या भावनांची जाण ठेवा.                      ज नावरांप्रती माणुसकी दाखवा , प्राण्यांना होणाऱ्या त्रासाची जाण ठेवा. असे आपण बोलतो , ऐकतो मात्र खरंच तसं वागतो का ? काही दिवसांपूर्वी महामार्गावर वाहनांच्या चाकाखाली आल्याने चिरडलेले माकड , कुत्रा यांचे फोटो पाहिले. पाहताच क्षणी जिवाचा तळफळाट झाला. गेल्या आठवड्यातच एका माकडाला निर्दयीपणे मारत असलेल्या तिघांचा व्हिडीओ व्हायरल झाला , सर्वत्र संतापाची लाट उसळली. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांना अटक झाली , तेव्हा कुठे अनेकांच्या मनाला थोडी शांती लाभली. मनुष्य खरंच खूप निर्दयी होतोय का ? आज पुन्हा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.             आमच्या घराशेजारी असलेले एक कुटूंब शेतकरी आहे. त्यांच्याकडे असलेल्या दोन म्हशी घराजवळच बांधलेल्या असतात. काल परिसरातच राहणाऱ्या कुणीतरी घरातील खराब बुरशी लागलेले बुंदीचे लाडू एका म्हशीला खावू घातले. काही वेळातच म्हशीला त्रास होऊ लागला. बिचारी मूक प्राण...

दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!

Image
दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!      महाराष्ट्र शासनाने महिलांच्या विकासासाठी नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी २०११ पासून राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच पदभार स्विकारलेल्या अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी अवघ्या काही महिन्यातच अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या या अभियानाविषयी जागतिक महिला दिनानिम्मित आर.विमला यांच्याकडून जाणून घेवूया सविस्तर माहिती..! अभियानाचा मुख्य उद्देश आणि स्वरूप    २०११ मध्ये केंद्र शासनाने जे वंचित आहेत अशा गोरगरीब जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा त्यासाठी या अभियानाची स्थापना केली. एकट्याने कोणतेही कार्य हाती घेतल्यास ते लवकर शक्य होत नाही, असा विचार करीत जास्तीत जास्त संस्था निर्माण करण्यावर शासनाने भर दिला. केंद्र शासनाने पंचसूत्री तर राज्यशासनाने दशसुत्री कार्यक्रमाची आखणी केली. त्यानुसार महिलांना एकत्र आणणे, त्यांची बैठक घेणे, बचतीची सवय...

अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’

Image
अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’     बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास, वेळोवेळी मिळालेले धक्के, पदरी पडलेले नैराश्य यातून खचून न जाता स्वयंसिद्धा अभियानात आजवर लाखो मुलींना प्रशिक्षित करून स्वतःला सिद्ध करण्यायोग्य बनविणाऱ्या मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी कविता सुभाष नावंदे यांची ही यशकथा..!     कविता यांचे मूळ गाव आंबेजोगाई. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. घरात चार बहिणी, १ भाऊ असा परिवार. वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदलीमुळे परळी, पाटोदा, बीड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण  केले. वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण करताच लग्न झाले. बीपीएड, एमपीएडचे शिक्षण औरंगाबाद येथे घेतले. ‘ते’ सात दिवस पहिला संघर्ष     ८० च्या दशकात मुलींना फारसे शिक्षण घेऊ दिले जात नव्हते. कविता यांचे वडिल माणिकराव यांनी देखील त्यांना दहावीनंतर पुढे शिक्षण बंद असा आदेशच घरात दिला. आईने मस्का लावला, वडिलांच्या विनवण्या केल्या, मैत्रिणींच्या पालकांनी समजाविले परंतु ते काही ऐकत ...

*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*

Image
*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*           गेल्या अनेक वर्षांपासून कायम असलेली सेना-भाजप युती यावर्षी नाट्यमय घडामोडी होऊन तुटली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणाच केली. अवघे काही दिवस उलट नाही तोच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे वक्तव्य केले. केवळ आपलीच चर्चा मतदारांमध्ये रहावी या उद्देशाने भाजप-सेनेने भांडण केलं असल्याचे आता वाटतं आहे.      गेल्या चार महिन्यापासून राज्यात निवडणुकीची चर्चा सुरु आहे. चर्चा तर सर्व करताय पण कुणाची..? आठवण करून बघा जरा, कोणत्या पक्षाचं नाव येतं ओठांवर? भाजप आणि शिवसेना दोनच नाव लक्षात येतात. का तर, गावात ज्याची चर्चा, त्याचेच नाव ओठी असते. तशीच गंमत सध्या आपल्याकडे आहे. भाजप आणि सेना युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यातच त्यांचा दिवस जात होता. त्यामुळे कोणतीही वृत्तवाहिनी सुरु करा किंवा वृत्तपत्र वाचा दोनच नावे समोर भाजप आणि सेना. अगोदर युती कायम राहणार असे सुतोवाच करून ‘पहले तुम, पहले तुम’ करीत...

नवीन वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास...!

Image
नवीन वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास...!         मित्रांनो गेल्या साडेचार वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात वावरतांना अनेक दिग्गज संपादक, सहकारी, मित्र यांच्याकडून खूप काही शिकलो. गेल्या दोन वर्षापासून नवे वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास असे समीकरणच जुळले आहे. गेल्या नववर्षाला दै.गावकरी मध्ये रुजू झालो तर यावर्षी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात रुजू . बघूया हे वर्ष माझ्या सुप्त कलागुणांना आणखी काय- काय वाव देणार..!       जळगाव शहरात राहतांना यू बी ग्रुपमधून मर्चंटायझर, त्यानंतर छायाचित्रकार असे काम करतांना अनावधनाने पत्रकारिता क्षेत्रात आलो. सुरुवातीला दै.सकाळमध्ये शनिपेठ परिसरासाठी ‘सिटीझन रिपोर्टर’ म्हणून सुरुवात केली. सुरेश उज्जेनवाल सरांनी प्राथमिक पत्रकारिता समजाविली, परंतु मीच गंभीर नसल्याने फारशी मनावर घेतली नाही. खरी पत्रकारिता सुरु...     दैनिक देशोन्नतीमध्ये माझे मित्र योगेश चौधरी, निखील सोनार यांच्या मदतीने मला उपसंपादक म्हणून संधी मिळाली. पत्रकारितेमधील ‘प’ सुद्धा माहित नसलेल्या मला आवृत्ती प्रमुख मनोज बारी सरांनी खरा पत्रकार समज...

नाथाभाऊ : आपल्या माणसाची, आपुलकीची भेट!

Image
नाथाभाऊ : आपल्या माणसाची, आपुलकीची भेट!          मुंबईत आल्यापासून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. खान्देशातील अनेक माणसं भेटली, गप्पा झाल्या, ओळखी निघाल्या, परंतु आपुलकी नव्हती मिळाली. अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे नाथाभाऊ (एकनाथराव खडसे) यांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली अन मिळाली ना तीच आपल्या मातीची, आपल्या माणसाची आपुलकी..!             जळगावकर हक्काने सांगतात असे हक्काचे व्यक्तिमत्त्व नाथाभाऊ. एरव्ही मुंबईत असतांना मंत्री म्हणून भाऊ नेहमी व्यस्त होते. तरीही आपल्या परिवाराला, कार्यकर्त्यांना वेळ देणे, विचारपूस करणे हा त्यांचा पहिल्यापासूनच गुणधर्म. जळगाव आणि कोथळी येथे मुक्ताई बंगल्यावर ती जत्रा मी अनेकदा अनुभवली. नाथाभाऊ, कसे हळव्या मनाचे, मनमोकळे व्यक्तिमत्व हे मोजक्याच जवळच्या लोकांना माहिती. मुंबईत आल्यापासून मी जवळपास सर्व मंत्र्यांची कार्यालये हुडकून काढली. काही ना काही काम होतेच. मंत्री महोदयांना पाहण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष बोलणे मात्र कुणाशीही नाही झाले. जळ...

*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू*

Image
*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू* *‘क्रीएटिव्ह ग्रुप’ची धाव, ‘ब्लू डायमंड’ची ओशाळलेली माणुसकी, तत्पर असलेले ‘तेज’*      मित्रांनो नुकतेच माझ्या परिवारावर एक मोठे संकट आले. पैशांपेक्षा माणुसकी महत्वाची असते हे आजवर आपण केवळ बोलतच आलोय परंतु, मी जळगाव शहरात परिस्थितीनुसार बदलत जाणाऱ्या व्यक्तींचे काही पैलू मी त्यादिवशी दोन तासात अनुभवले. माझ्या मदतीसाठी लागलीच धावून आलेल्या ‘क्रीएटिव्ह ग्रुप’ आणि लागलीच उपचार सुरु करणारे डॉ.तेजेंद्र चौधरी यांचे विशेष आभार मांडण्यासाठी हा ब्लॉग.... अरे हो, एक राहिलेच ..! माणुसकीपेक्षा पैसा श्रेष्ठ असलेले डॉ.‘ब्लू डायमंड’ यांचे मनापासून विशेष आभार...!     गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास माझे वडील रविंद्र वाणी(आप्पा) यांना दुकानावर असतांना अचानक लकव्याचा सौम्य झटका आला. त्याचा परिस्थितीत त्यांनी मला फोन केला. मी घरी होतो त्याच अवस्थेत गाडी काढली आणि निघालो. दुचाकीवर असतांनाच ‘क्रीएटिव्ह ग्रुप’च्या दोन मित्रांना फोन केले, मी दुकानावर पोहचतो तोच ते देखील हजर होते. *तब्बल अर्धातास फिरफिर*  ...