Posts

*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू*

Image
*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू* *‘क्रीएटिव्ह ग्रुप’ची धाव, ‘ब्लू डायमंड’ची ओशाळलेली माणुसकी, तत्पर असलेले ‘तेज’*      मित्रांनो नुकतेच माझ्या परिवारावर एक मोठे संकट आले. पैशांपेक्षा माणुसकी महत्वाची असते हे आजवर आपण केवळ बोलतच आलोय परंतु, मी जळगाव शहरात परिस्थितीनुसार बदलत जाणाऱ्या व्यक्तींचे काही पैलू मी त्यादिवशी दोन तासात अनुभवले. माझ्या मदतीसाठी लागलीच धावून आलेल्या ‘क्रीएटिव्ह ग्रुप’ आणि लागलीच उपचार सुरु करणारे डॉ.तेजेंद्र चौधरी यांचे विशेष आभार मांडण्यासाठी हा ब्लॉग.... अरे हो, एक राहिलेच ..! माणुसकीपेक्षा पैसा श्रेष्ठ असलेले डॉ.‘ब्लू डायमंड’ यांचे मनापासून विशेष आभार...!     गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास माझे वडील रविंद्र वाणी(आप्पा) यांना दुकानावर असतांना अचानक लकव्याचा सौम्य झटका आला. त्याचा परिस्थितीत त्यांनी मला फोन केला. मी घरी होतो त्याच अवस्थेत गाडी काढली आणि निघालो. दुचाकीवर असतांनाच ‘क्रीएटिव्ह ग्रुप’च्या दोन मित्रांना फोन केले, मी दुकानावर पोहचतो तोच ते देखील हजर होते. *तब्बल अर्धातास फिरफिर*  ...

राजकीय किंगमेकर 'भाऊ-दादां'ची भूमिका संशयास्पद!

Image
राजकीय किंगमेकर 'भाऊ-दादां'ची भूमिका संशयास्पद! खडसे 'रावेर लोकसभा' मतदार संघात तर दादा '7 शिवाजीनगरा'त व्यस्त       जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांची धामधूम सुरू असतांना एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाची सुरूवात ज्यांच्या नावाने होत होती ते किंगमेकर आ.एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन यांची सध्या असलेली राजकीय भूमिका संशयास्पद दिसत असल्याने अनेकांच्या मनात प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.             जिल्ह्यात कोणतीही निवडणूक आल्यास किंवा एखादा राजकीय डाव खेळायचा असल्यास काही वर्षापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन यांचेच नाव आघाडीवर असायचे. जैन शक्यतो शहराच्या आणि ठराविक न.पा.च्या राजकारणात लक्ष घालायचे तर खडसे जिप, पंस, इतर न.पा.च्या निवडणुकांचे नियोजन करीत होते. राज्याच्या राजकारणातही या दोन किंगमेकरांची वेगळीच छबी होती.      घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा जैन हे साडेचार वर्ष कारागृहात असल्याने राजकारणापासून लांबच राहिले. त्याच काळात युत...

भाजपाच्या शेतीत सेना, राष्ट्रवादीला येईल बहर!

Image
भाजपाच्या शेतीत सेना, राष्ट्रवादीला येईल बहर! गटबाजीचा फटका आगामी निवडणुकीत बसणार : विधानपरिषद ही भाजपकडून जाणार?      राज्यासह जिल्ह्यातील भाजपची स्थिती लक्षात घेता एकमेकांवर शरसंधान साधण्याचे पराक्रम आपल्याच नेत्यांकडून केले जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसला भुईसपाट करून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण केलेल्या जळगावात आगामी नगरपालिका, नगरपंचायत आणि विधानपरिषद निवडणुकीत आपला बालेकिल्ला आपल्याच कुरघोड्यांनी ढासळतांना पाहण्याची मज्जा अनुभवता येणार आहे. भाजपातील अंतर्गत मतभेद सध्या जास्तच चव्हाट्यावर आले असल्याने आगामी निवडणुका चुरशीच्या ठरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा सरळसरळ लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे.      राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात कोणत्या न कोणत्या कारणावरून आरोप, प्रत्यारोप होत असून मी योग्य हे दाखविण्याच्या प्रयत्नात इतर मंत्री डागाळले जात आहेत. जिल्ह्यातही पुर्वीपासून आम्ही एकच असल्याचा डंका वाजवणिारे भाजपचे जेष्ठ नेते...

'रासक्रीडा वहना'च्या दिवसाची वर्षभर प्रतिक्षा

Image
                         'रासक्रीडा वहना'च्या दिवसाची वर्षभर प्रतिक्षा              देशात दिवाळी तर सर्वत्रच साजरी होते. आपण देखील दिवाळीचा सण साजरा करतो. जळगावात तर दिवाळीच्या काळात रथोत्सव आणि वहनोत्सव साजरा होत असल्याने दिवाळीची रंगतच वेगळी असते. दिवाळीचा पंधरवडा सर्वांसाठी सारखाच असला तरी शनीपेठ, बळीरामपेठेतील नागरिक, विशेषतः महिलावर्ग मात्र रासक्रीडा वहनाच्या आगमनाची वाट पाहत असतात. त्याला कारणही तसेच आहे हो...!!      दिवाळी सण आली की सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बोनस, फटाके, मिठाई, फराळ, नवीन कपडे, रोषणाई, दिवे असा सर्व झगमगाट प्रत्येकाच्या ध्यानीमनी असतो. जळगावात तर दिवाळीची मज्जा श्रीराम मंदिर संस्थानतर्फे काढण्यात येणाऱ्या वहन आणि प्रभू श्रीरामांच्या रथामुळे जास्तच वाढते. लक्ष्मीपूजननंतर बलीप्रतिपदेला वहनाला सुरुवात होते. शहरात वहनाचा मार्ग असलेल्या परिसरात वहन मा...

खाकीतील सर्वसामान्य स्त्री 'मोक्षदा पाटील'(IPS)

Image
*खाकीतील सर्वसामान्य स्त्री 'मोक्षदा पाटील'(IPS)*         एरव्ही आपण एखाद्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याकडे पहिले असता अनेकांना तोराच जास्त असल्याचे जाणवते. त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी असेल तर अधिकच. त्या खाकी मागे ही एक सर्वसामान्य व्यक्ती असतो, याची फार कमी लोकांना जाणीव असते. अशाच आपल्या जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यातील एक सर्वसामान्य स्त्री बुधवारी फुले मार्केटला बघायला मिळाली.       लहानपणीच जळगावची काहीशी ओळख असलेल्या IPS मोक्षदा पाटील यांची जळगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी वर्णी लागली. काही महिन्यांपूर्वीच त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांनी जळगावच्या अपर पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळला. रोखठोक बोलणे, कामाचा असलेला अनुभव, काम करण्याची वेगळी कार्यशैली, शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे त्यांचा स्वभाव फारच कणखर असल्याचा समजच जळगावकरांनी केला.       माझी आणि मोक्षदा पाटील यांची बातम्यांसाठी नेहमीच भेट होते. परंतु आजवर गेल्या...

'एसपीं'कडून पोलिसांना एम.एस.धोनीच्या स्वरूपात 'दिवाळी भेट'

Image
जळगावातील ५०० वर पोलिसांनी घेतला 'एम.एस.धोनी'चा आनंद       राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून सण, उत्सव, परिवार विसरून सतत दक्ष राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देशभर गाजलेल्या एम.एस.धोनी हा चित्रपट दाखवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी नवा पायंडा निर्माण केला आहे. एकप्रकारे पोलिसांना हि दिवाळी भेट आहे. राज्यातील हा दुसराच उपक्रम आहे.       जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.सुपेकर नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. समाधान हेल्पलाईन, वाचनालय, जॉब, करियर मार्गदर्शन केंद्र, स्केटिंग ग्राउंड, कराटे प्रशिक्षण यासारखे विविध उपक्रम त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाल्यांसाठी सुरु केले आहेत.        सध्या देशात एम.एस.धोनी चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून चित्रपटाने चांगला गल्ला हि जमवला आहे. सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आल्यानंतर फुटबॉल गोलकीपर ते टीम इंडियाचा कर्णधार हा प्रवास पूर्ण करतांना महेंद्र धोनी याने किती कष्ट घेतले. टीसी असतांना घेतलेली मेहनत, आयुष्यात आलेले ख...

टि.व्हीं.चे बदलते पाच तंत्रज्ञान हाताळतात ‘लेहरचंद’

Image
टि.व्हीं.चे बदलते पाच तंत्रज्ञान हाताळतात ‘लेहरचंद’ जागा कमी करतांना राहिल्या एलसीडी, एलईडीमध्ये त्रुटी : उद्योगात फटका बसल्याने थाटला स्वत:चा व्यवसाय जळगाव - जगात बदलत्या काळानुसार दररोज नवनवीन शोध लागत आहे. टि.व्ही.च्या तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे पुर्वी अवाढव्य असलेले टि.व्ही. आज भिंतीवर टांगता येवू शकतात. शहरातील लेहरचंद पोलडिया यांनी इलेक्ट्रीकलचे उच्चशिक्षण घेतल्यानंतर स्वत:चा उद्योग उभारला, परंतु त्यात नुकसान झाल्याने गेल्या 35 वर्षापासून ते व्यवसायातून आजवर 5 विविध प्रकारच्या टि.व्ही.ची दुरूस्ती करीत आहेत. जगात दररोज नवनवीन शोध लागत असतात. साधारणत: 40 ते 50 वर्षापूर्वी अवाढव्य रूंदी असलेले टिव्ही आज केवळ काही सेंटीमीटरच्या रूंदीवर येवून ठेपले आहे. ‘त्या’काळात घेतले उच्चशिक्षण लेहरचंद मुरारजी पोलडिया यांनी 1980 मध्ये पुणे विद्यापिठातून एम.एस्सी इलेक्ट्रिकलचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर बूश आणि ओनिडा कंपनीत वरीष्ठ अभियंता म्हणून ते कार्यरत 5 वर्ष होते. * टि.व्ही. बाजारात आणण्यासाठी होत्या 150 चाचण्या* 1980 च्या दशकात आयसी, पिक्चर ट्युबचे तंत...