टि.व्हीं.चे बदलते पाच तंत्रज्ञान हाताळतात ‘लेहरचंद’

टि.व्हीं.चे बदलते पाच तंत्रज्ञान हाताळतात ‘लेहरचंद’

जागा कमी करतांना राहिल्या एलसीडी, एलईडीमध्ये त्रुटी : उद्योगात फटका बसल्याने थाटला स्वत:चा व्यवसाय

जळगाव - जगात बदलत्या काळानुसार दररोज नवनवीन शोध लागत आहे. टि.व्ही.च्या तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे पुर्वी अवाढव्य असलेले टि.व्ही. आज भिंतीवर टांगता येवू शकतात. शहरातील लेहरचंद पोलडिया यांनी इलेक्ट्रीकलचे उच्चशिक्षण घेतल्यानंतर स्वत:चा उद्योग उभारला, परंतु त्यात नुकसान झाल्याने गेल्या 35 वर्षापासून ते व्यवसायातून आजवर 5 विविध प्रकारच्या टि.व्ही.ची दुरूस्ती करीत आहेत.
जगात दररोज नवनवीन शोध लागत असतात. साधारणत: 40 ते 50 वर्षापूर्वी अवाढव्य रूंदी असलेले टिव्ही आज केवळ काही सेंटीमीटरच्या रूंदीवर येवून ठेपले आहे.
‘त्या’काळात घेतले उच्चशिक्षण
लेहरचंद मुरारजी पोलडिया यांनी 1980 मध्ये पुणे विद्यापिठातून एम.एस्सी इलेक्ट्रिकलचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर बूश आणि ओनिडा कंपनीत वरीष्ठ अभियंता म्हणून ते कार्यरत 5 वर्ष होते.
* टि.व्ही. बाजारात आणण्यासाठी होत्या 150 चाचण्या*
1980 च्या दशकात आयसी, पिक्चर ट्युबचे तंत्रज्ञान असलेले टि.व्ही. बाजारात येवू लागल्यानंतर शासनाने ईआरटीएल चाचणी केंद्र कलकत्ता येथे सुरू केले. त्याठिकाणी जवळपास 7 कोटींचे विविध साहित्य होते. बाजारात टि.व्ही.चे उत्पादन आणण्यापूर्वी उत्पादकाला त्या टि.व्ही.ला इआरटीएल संशोधन केंद्रात पाठवावे लागत होते. तेथे जवळपास 150 प्रकारच्या चाचण्यांमध्ये पास झाल्यावर ‘क्वॉलिटी अ‍ॅपरूव्हल सर्टीफिकेट’ दिले जात असे. त्यानंतरच तो टि.व्ही. बाजारात याचचा. शासनाच्या ‘इआरटीएल’ संशोधन केंद्रात लेहरचंद यांनी मुंबईच्या कंपनीमार्फत 3 महिने कार्य केले होते.
स्वत:चा उद्योग उभारला पण..
कलकत्ता येथून परतल्यानंतर लेहरचंद यांनी 1989 मध्ये जळगावात ‘क्रेस्ट टि.व्ही. मॅन्युफॅक्चरिंग’ नावाने टि.व्ही. उत्पादनाचा स्वत:चा उद्योग उभारला. परंतु दोनच वर्षात बाजारातील परिस्थिती आणि भागीदारी डगमगल्याने उद्योग बंद करावा लागला.
भविष्यात येणार ‘पेपर टि.व्ही’
राज्यात 1972 मध्ये वाल्ट तंत्रज्ञानाचे टि.व्ही. आले. त्यानंतर कमीत कमी साहित्य वापरून चांगल्यात चांगले उत्पादन बनविण्याची स्पर्धा निर्माण झाली. त्यानंतर ट्रान्झिस्ट तंत्रज्ञानाचे टि.व्ही. बाजारात आले.  पुढे आय.सी.तंत्रज्ञानाचे रंगीत टि.व्ही. बाजारात आले. स्पर्धा वाढल्याने 2002 मध्ये एलसीडी (लिक्वीड क्रिस्टल डिस्प्ले) तंत्रज्ञानाचे टि.व्ही. बाजारात आले. पुढे एलईडी (लाईट इमिटींग डिस्प्ले) तंत्रज्ञानाचे टि.व्ही. बाजारात आले.  कमीत कमी जागेत उच्च गुणवत्ता असलेले टि.व्ही. बाजारात आणण्याची स्पर्धा सुरू असल्याने परदेशातात सध्या पेपर टि.व्ही. तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून घडी घालण्यासारखे ते टि.व्ही. असतील अशी माहिती लेहरचंद पोलडिया यांनी दिली.
नवीन तंत्रज्ञान उत्तम
तरीही काही उणिवा कायम
नवीन तंत्रज्ञानाचे एलसीडी, एलईडी टि.व्ही. उर्जा, वीज बचतीच्या बाबतीत उत्तम आहेत. त्यांची पारदर्शकताही अधिक आहे. कमी जागेत जास्तीत जास्त वैशिष्ट्ये देतांना टि.व्ही.तील उष्णता बाहेर पडण्यासाठी कमी जागा मिळते. भारत उष्णप्रदेश आहे आणि आपल्या देशात धुळीचे प्रमाणही अधिक आहे. तसेच विद्युतप्रवाह वारंवार चढउतार होत असल्याने एलसीडी, एलईडी खराब होण्याचे प्रमाण भारतात जास्त असल्याचे लेहरचंद यांनी सांगितले.
*कशी घ्यावी एलसीडी, एलईडीची काळजी*
एलसीडी, एलईडी भिंतीपासून 6 ते 8 इंच दूर असावा. जमिनीपासून 6 फूट उंच असावा. टि.व्ही.च्या पॅनलला कधीही ओल्या फडक्याने किंवा कोणत्याही द्रव पदार्थाने पुसू नये. टि.व्ही.च्या चहूबाजूने हवा खेळती असावी. दररोज दोन वेळेस स्वच्छ कोर्‍या कपड्याने टि.व्ही. पूर्ण पुसावा. स्पार्क गाईड वापरावे. टि.व्ही.च्या वापरानंतर मेन स्वीच बंद करावा. पावसाळ्यात वीज कडाडत असताना सर्व वायर काढून ठेवाव्यात. सहा महिन्यातून एकदा तरी ब्लोर (हवा मारण्याचे मशीन) ने सर्व धूळ साफ करावी. अशी दक्षता घेतल्यास एलसीडी, एलईडीचे आयुष्य नक्कीच वाढते.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग