Posts

‘शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी सोशलमिडीयाचा उपयोग’

Image
‘शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी सोशलमिडीयाचा उपयोग’ सोशलमिडीयाचा उपयोग चांगल्या प्रकारे होवू शकतो याचे उत्तम उदाहरण गेल्या काही दिवसापासून व्हॉटस्‌ऍपवर फिरत असलेल्या एका व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून आपल्याला पहावयास मिळत आहे. सध्या राज्यात सर्वत्र दृष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे. कितीही प्रयत्न केले तरी निर्सगापुढे मानव हतबल असतो हेच यावरून दिसून येते. दोन वर्षापूर्वी राज्यात पडलेला कोरडा दृष्काळ गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे बळीराजाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात दृष्काळी परिस्थिती निर्माण झाली असता सर्वाधिक नुकसान शेतकर्‍याचे होत असल्याने त्यांना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्येचा पर्याय अंगीकारावा लागतो. गेल्या काही वर्षात ऍड्रॉंईड मोबाईल प्रत्येकाच्या हातात आले असून मोबाईल नेटवर्क पुरविणार्‍या कंपन्यांनी इंटरनेटचे दरही कमी केलेले आहेत. लहानश्या पाड्यापासून मेट्रोसिटीतील बहुतांश व्यक्ती मोबाईलवर सोशलमिडीयाचा वापर करताना दिसून येत आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍याची असलेली व्यथ...

गुरू परंपरा आणि माझे मत

Image
गुरू परंपरा आणि माझे मत  वाणी समाजातील सध्या वैश्य, वळंजू या नावांनी ओळखल्या जाणार्या आपल्या समाजाला शाप देण्यात आला असल्याने अनेक वर्षापासून गुरू नव्हते. परंतु, सन 2004 पासून आपल्या समाजाला श्री संस्थान हळदीपुर शांताश्रम मठाधिपती परमपुज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामी गुरू म्हणून मिळाले. गुरू असल्यास समाजाचा विकास निश्चित होते असा आजवरचा अनुभव आहे. प्रत्येक समाजाला एक गुरू आहेत त्यामुळे आपल्या समाजालाही गुरू असावेत अशी धारणा अनेकांची झाली प्रामुख्याने आपल्या वडीलधार्यांनी यावर लागलीच विश्र्वास ठेवला. मुळात आपण वैश्यवाणी असल्याने आपल्याला गुरू नव्हते ही धारणाच चुकीची आहे. वैश्यवाणी हे इतर वाणी बांधवांपेक्षा वेगळे नसल्याने आपण त्यांच्याप्रमाणे 'संत तुकाराम' यांना आपले गुरू का मानले नाही. त्यांच्याप्रमाणे मोठ्याप्रमाणावर संत तुकाराम महाराज जयंती व तुकाराम बीजोत्सव का साजरा केला नाही असा प्रश्न मला पडतो.     मुळात मी लहान असल्यापासून जळगावात मला संत तुकाराम हे आपले समाजगुरू आहेत हे माहितीच नव्हते परंतु मी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नंदुरबार येथे दंडपाणेश्र्व...
तू हि रे माझा मितवा  आपल्याकडे साजरा होत असलेला वेलेंटाइन विक  मूळ पाशात्या दिवस आहे परंतु प्रेमीयुगल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दिवस लपत छपत का असेना साजरे करतात. मी देखील गेल्या काही वर्षापासून वेलेंटाइन डे साजरे करत होतो मात्र यावर्षी मी कोणालातरी मिस करत होतो तरीही मी माझ्या मित्रांसोबत आनंद साजरा केला. आजच रिलीज झालेला मराठी चित्रपट 'मितवा' मित्रांसोबत पाहण्याचा बेत आखला होता पण काही कारणास्तव ते रद्द करावे लागले. प्रेमकथा त्यातच मराठी चित्रपट असल्याने मी चित्रपट पाहण्याचा विचार मनाशी पक्का केला व एकटाच चित्रपट पाहण्यासाठी गेलो. लव्हस्टोरी असल्याने चित्रपट पाहतांना माझ्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला परंतु यावेळी "ती" माझ्यासोबत नव्हती. "प्रेम" ही वाटते तेव्हढी सोपी गोष्ट नाही. मुळात प्रेम ही गोष्टच नाही ती एक अदृष्यशक्‍ती आहे दोन मने जुळविण्याची. आजकालची युवापिढी माझ्यासारखे तरूणी-तरूणी प्रेमाच्या जाळ्यात सहज ओढले जातात. काही दिवस प्रेमाच्या नावाखाली आणाभाका घेत मौजमजा केल्यानंतर वारंवार उडत असलेल्या खटक्‍यांमुळे त्यांना ते प्रेम नकोसे ...

खबरदार : ऑनलाईन गेम्स नव्हे व्यसन?

Image
खबरदार : ऑनलाईन गेम्स नव्हे व्यसन? सध्याच्या युगात मोबाईल जगात खूप मोठी क्रांती झाली असून दररोज नवनवीन मोबाईल बाजारात येत आहेत. मोबाईलसोबतच नवीन गेम्स पण उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यापासून तीनपत्ती आणि क्यांडी क्रश सागा या गेम्सची नावे कानावर पडत असल्याने मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये तीनपत्ती गेम डाऊनलोड केला. परंतु त्यामुळे माझा दररोज कमीत कमी २ तास वेळ वाया जात होता. त्यातच आठ दिवसांपासून व्हात्स अप वर एक संदेश येत असून मोबाईलमध्ये वापर करण्यात येणारे गेम्स हे विदेशात तयार करण्यात आले असून त्यात तरुणांना गुंतवून हिंदुस्तानला महासत्ता होण्यापासून रोखणे हा त्यांचा प्रमुख हेतू आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.  त्यामुळे मी तत्काळ  माझ्या मोबाईलमधून तो गेम डीलीट केला.  मित्रांनो आता तुमचं भविष्य  तुमच्या  हातात आहे…… 
होलिकोस्तव, रेन डान्सची काय गरज? देशात सर्वत्र साजरा होणारा सण होळी/धुलीवंदन/रंगपंचमी  अवघ्या ७ दिवसांवर येउन ठेपला असून तरुणाई नियोजन  मग्न आहे. परंतु गेल्या १५ दिवसात जिल्ह्यासह राज्यात झालेल्या गारपीटच्या नुकसानीचा विचार एकही तरुण करत नाही. त्यातच शासन हि आचारसंहितेचे कारण करून मदत जहिर करण्यास मागेपुढे पाहत आहे आणि राजकारणी आपले राजकारण खेळण्यात मश्गुल आहेत . जळगावात देखील काही मंडळ, ग्रुप, संस्था यांनी जल्लोषात होलीकोस्तव साजरा करण्याचे ठरविले असून त्यासाठी हजारो रुपये खर्चून डीजे, रेन डान्सची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरात जागोजागी बेनर्स लावले जात आहे. इकोफ्रेण्डली रंगपंचमी साजरी होत असल्याने अनेक राजकारणी देखील आर्थिक मदत करत आहेत.    वर्षातून एक दिवस साजऱ्या केल्या जाणार्या या सणाला एक वर्ष ब्रेक देऊन तेच हजारो रुपये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना  दिल्यास प्रत्येकाला अनमोल असा आशिर्वाद मिळेल आणि गरीबाच्या चेहर्यावर हास्याची एक लहर उमटेल.      मित्रांनो आपण आजच विचार करा आणि माझा हा संदेश सर्व तरुणांमध्ये पोहचवून स्वतासह का...

महाविद्यालयीन युवतींसाठी 'टाईमपास ' कितपत योग्य ?

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना सुगीचे दीवस आले असून हि मराठी माणसांसाठी एक अभिमानाचीच बाब आहे . नुकत्याच काही दिवसांपूर्वी येउन गेलेल्या 'दुनियादारी ' आणि आताच आलेल्या  'टाईमपास ' चित्रपटाने तर अवघ्या तरुणाईला वेड लावले असून प्रत्येकाच्या मनात प्रेमाचेच वारे वाहत आहेत. परंतु   'टाईमपास ' चित्रपटात एक गरीब अशिक्षित मुलाला एक श्रीमंत घरातील सुशिक्षित मुलीवर प्रेम करतांना दाखविण्यात आले असून तो तिच्या वडिलांचा अहंकार जिरविण्यासाठी 'साईबाबा व आईबाबांची शपथ' घेऊन तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचे ठरवून तिला आपल्या जाळ्यात अड्कावितो . मित्रांच्या डिचविन्यामुळे सुरु केलेले   'टाईमपास ' प्रेम केव्हाच खरे होते हे त्याला स्वतालाही काळात नाही . संपूर्ण  चित्रपटात नायिकेवर प्रेम करतांना नायक तिची खूप काळजी घेत तिला कोणतीही इजा करत नाही . परंतु  चित्रपटाबाहेरील जगात सर्व उलटच घडत असून गरीब, अशिक्षित कुटुंबातील व टारगट  मुलेही श्रीमंत सुशिक्षित मुलगी आपल्या जाळ्यात अडकविण्याचे स्वप्न (ध्येय ) ठरवूनच फिरत असून एखादी मुलगी आवडल्यास तिला...

आपले मत कोणत्याही पक्षाला न देत माणूस पाहून द्यावे…… !!!

        महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात आपल्या वकृत्व शैलीने तरुणांच्या मनावर चांगला ठसा मिळवला. नाशिक महानगरपालिकेवरही भाजपच्या सहाय्याने आपला झेंडा रोवला. कदाचित  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप उमटावी आणि आपल्याला एक हातही सत्ता मिळावी हेच त्यांचे उद्दिष्ट असावे म्हणून जळगाव मनपाच्या निवडणुकीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी निर्माण केलेल्या आम आदमी पार्टीने वेगळ्यापद्धतीने प्रचार करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. आपने कॉंग्रेसच्या मदतीने दिल्ली विधानसभा काबीज केल्यानंतर केजरीवाल यांना देश काबीज करण्याचे वेध लागले मग त्यासाठी ऐन २६ जानेवारीच्या काळात जनतेच्या सुरक्षेचे वाटोळे करीत रस्यावर आंदोलन केले. देशात गेल्या काही महिन्यापासून मोदी फिवर सुरु असल्याने राज ठाकरे यांनी देखील त्यांना अजाहीरपणे पाठींबा दिला पण काही दिवसांपूर्वी अचानक घुमजाव देखील केले. का...