‘शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी सोशलमिडीयाचा उपयोग’


‘शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी सोशलमिडीयाचा उपयोग’

सोशलमिडीयाचा उपयोग चांगल्या प्रकारे होवू शकतो याचे उत्तम उदाहरण गेल्या काही दिवसापासून व्हॉटस्‌ऍपवर फिरत असलेल्या एका व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून आपल्याला पहावयास मिळत आहे. सध्या राज्यात सर्वत्र दृष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे. कितीही प्रयत्न केले तरी निर्सगापुढे मानव हतबल असतो हेच यावरून दिसून येते. दोन वर्षापूर्वी राज्यात पडलेला कोरडा दृष्काळ गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे बळीराजाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात दृष्काळी परिस्थिती निर्माण झाली असता सर्वाधिक नुकसान शेतकर्‍याचे होत असल्याने त्यांना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्येचा पर्याय अंगीकारावा लागतो.
गेल्या काही वर्षात ऍड्रॉंईड मोबाईल प्रत्येकाच्या हातात आले असून मोबाईल नेटवर्क पुरविणार्‍या कंपन्यांनी इंटरनेटचे दरही कमी केलेले आहेत. लहानश्या पाड्यापासून मेट्रोसिटीतील बहुतांश व्यक्ती मोबाईलवर सोशलमिडीयाचा वापर करताना दिसून येत आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍याची असलेली व्यथा व शेतकरी बापाला पाऊस नसल्याने भेडसावत असलेली चिंता पाहून चिमुकलीला वाटत असलेली काळजी यावर आधारित मनाला भिडणारी एक व्हिडीओ क्लीप व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून फॉरवर्ड करण्यात येत आहे. गावागावात सोशलमिडीयाचा वापर होत असल्याने जनजागृती करणारी क्लीप पाठविण्यामुळे शेतकरी आत्महत्त्या रोखण्यास काही अंशी का असेना नक्कीच मदत होईल. राज्याचे कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राकडून 476 कोटी रूपयांची मदत प्राप्त झाली असून त्यामाध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या मुलांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शैक्षणिक शुल्क सरसकटपणे माफ, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांचे अभियांत्रिकी व वैद्यकिय शाखेचे 50 टक्के शुल्क सरकार देणार, दुबार पेरणी लाभार्थी शेतकर्‍यांना बियाणे व 1500 रूपये अनुदान इतकेच नव्हे तर पशू छावण्या, वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती असलेले वॉलपेपर फॉरवर्ड करण्यात येत आहे. शासनाच्या योजना शेतकर्‍यांना माहिती होण्यास यामाध्यमातून मदत होणार आहे. देशात शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असून मोठ्याप्रमाणावर जनजागृती करण्यात येत असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात मोठा हातखंडा असलेल्या सोशलमिडीयाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी होत असलेली जनजागृती नक्कीच प्रभावशाली ठरेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग