महाविद्यालयीन युवतींसाठी 'टाईमपास ' कितपत योग्य ?
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना सुगीचे दीवस आले असून हि मराठी माणसांसाठी एक अभिमानाचीच बाब आहे . नुकत्याच काही दिवसांपूर्वी येउन गेलेल्या 'दुनियादारी 'आणि आताच आलेल्या 'टाईमपास ' चित्रपटाने तर अवघ्या तरुणाईला वेड लावले असून प्रत्येकाच्या मनात प्रेमाचेच वारे वाहत आहेत. परंतु 'टाईमपास ' चित्रपटात एक गरीब अशिक्षित मुलाला एक श्रीमंत घरातील सुशिक्षित मुलीवर प्रेम करतांना दाखविण्यात आले असून तो तिच्या वडिलांचा अहंकार जिरविण्यासाठी 'साईबाबा व आईबाबांची शपथ' घेऊन तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचे ठरवून तिला आपल्या जाळ्यात अड्कावितो . मित्रांच्या डिचविन्यामुळे सुरु केलेले 'टाईमपास ' प्रेम केव्हाच खरे होते हे त्याला स्वतालाही काळात नाही . संपूर्ण चित्रपटात नायिकेवर प्रेम करतांना नायक तिची खूप काळजी घेत तिला कोणतीही इजा करत नाही . परंतु चित्रपटाबाहेरील जगात सर्व उलटच घडत असून गरीब, अशिक्षित कुटुंबातील व टारगट मुलेही श्रीमंत सुशिक्षित मुलगी आपल्या जाळ्यात अडकविण्याचे स्वप्न (ध्येय ) ठरवूनच फिरत असून एखादी मुलगी आवडल्यास तिला आपल्या प्रेमाचे आमंत्रण द्यायचे आणि तिने नाही उत्तर दिल्यास स्वताचे अथवा तिच्या जीवाचे काहीतरी करून टाकण्याची धमकी द्यायची असले प्रकार सध्या सर्रास सुरु आहेत . त्यातच आपल्या शहरातील एका नामांकित महाविद्यालय समितीने मुलींचे चित्रपट पाहण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे सर्वेक्षण करून त्यांना चक्क 'टाईमपास ' हा प्रेमाचा चित्रपट दाखविला हि गोष्ट माझ्यातरी मनाला काही पटली नाही , तुम्हाला काय वाटते 'त्या ' महाविद्यालयाने 'टाईमपास ' ऐवजी एखादा शैक्षणिक अथवा सामाजिकतेची जाण असलेला चित्रपट दाखवायला हवा होता कि आज जे केले तेच योग्य होते.
महाविद्यालयीन युवतींसाठी 'टाईमपास ' कितपत योग्य ?
Comments
Post a Comment