आपले मत कोणत्याही पक्षाला न देत माणूस पाहून द्यावे…… !!!

        महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात आपल्या वकृत्व शैलीने तरुणांच्या मनावर चांगला ठसा मिळवला. नाशिक महानगरपालिकेवरही भाजपच्या सहाय्याने आपला झेंडा रोवला. कदाचित आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप उमटावी आणि आपल्याला एक हातही सत्ता मिळावी हेच त्यांचे उद्दिष्ट असावे म्हणून जळगाव मनपाच्या निवडणुकीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी निर्माण केलेल्या आम आदमी पार्टीने वेगळ्यापद्धतीने प्रचार करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. आपने कॉंग्रेसच्या मदतीने दिल्ली विधानसभा काबीज केल्यानंतर केजरीवाल यांना देश काबीज करण्याचे वेध लागले मग त्यासाठी ऐन २६ जानेवारीच्या काळात जनतेच्या सुरक्षेचे वाटोळे करीत रस्यावर आंदोलन केले. देशात गेल्या काही महिन्यापासून मोदी फिवर सुरु असल्याने राज ठाकरे यांनी देखील त्यांना अजाहीरपणे पाठींबा दिला पण काही दिवसांपूर्वी अचानक घुमजाव देखील केले. काही वर्षापासून महाराष्ट्रात असलेला आपला प्रभाव आपमुळे कमी तर होणार नाही असा विचार सध्या राज ठाकरे करीत असावे तर अरविंद केजरीवाल दिल्लीवासियांप्रमाणे मराठी माणूस काबीज करायचा निर्धार करत असावेत. आपल्या देशातील प्रत्येक राजकारणी सर्वसामान्यानांना आश्वासणच देत असून आपला स्वार्थ साध्य करीत मिडियाच्या सहाय्याने चमकोगिरी करीत आहेत. आपले देशवासीयही त्यांच्या गोड गोड बोलण्यात येऊन आपले अनमोल मत त्यांच्या पदरी पडून स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेत आहे. देशाचा नवयुवक या नात्याने मला तरी असे वाटते की आपण आपले मत कोणत्याही पक्षाला न देत माणूस पाहून द्यावे…… !!!

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'