तू हि रे माझा मितवा
आपल्याकडे साजरा होत असलेला वेलेंटाइन विक मूळ पाशात्या दिवस आहे परंतु प्रेमीयुगल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दिवस लपत छपत का असेना साजरे करतात. मी देखील गेल्या काही वर्षापासून वेलेंटाइन डे साजरे करत होतो मात्र यावर्षी मी कोणालातरी मिस करत होतो तरीही मी माझ्या मित्रांसोबत आनंद साजरा केला. आजच रिलीज झालेला मराठी चित्रपट 'मितवा' मित्रांसोबत पाहण्याचा बेत आखला होता पण काही कारणास्तव ते रद्द करावे लागले. प्रेमकथा त्यातच मराठी चित्रपट असल्याने मी चित्रपट पाहण्याचा विचार मनाशी पक्का केला व एकटाच चित्रपट पाहण्यासाठी गेलो. लव्हस्टोरी असल्याने चित्रपट पाहतांना माझ्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला परंतु यावेळी "ती" माझ्यासोबत नव्हती. "प्रेम" ही वाटते तेव्हढी सोपी गोष्ट नाही. मुळात प्रेम ही गोष्टच नाही ती एक अदृष्यशक्ती आहे दोन मने जुळविण्याची. आजकालची युवापिढी माझ्यासारखे तरूणी-तरूणी प्रेमाच्या जाळ्यात सहज ओढले जातात. काही दिवस प्रेमाच्या नावाखाली आणाभाका घेत मौजमजा केल्यानंतर वारंवार उडत असलेल्या खटक्यांमुळे त्यांना ते प्रेम नकोसे वाटते. "मितवा" पाहतांना आज मला खरच जाणवले की, प्रेम मनापासून केल्यास ते आयुष्यभर सोबत असते. प्रेमिकेचे प्रेम काय असते? हे मी फार जवळून जाणले त्या प्रेमाचा आनंद घेतला आहे. आज माझ्या आयुष्यात येण्याची अनेकांची इच्छा असेल किंबहुना असेलही काहींनी माझ्याजवळ ती व्यक्तही केली परंतु मला नकोय त्या प्रेमाच्या आणाभाका, आज जर मी पुन्हा मनापासून प्रेमात पडण्याचा विचार केला तर तेच प्रेम माझे शेवटचे प्रेम असेल...!!!
मितवा चित्रपटात एकीला आपले प्रेम मिळते तर दुसरी त्याच प्रेमाचा त्याग करते. प्रेम मनापासून असेल आणि आपल्याला कोणीतरी आयुष्याची साथ देणारी कोणीतरी व्यक्ती असेल तर कितीही संकटे आली तर आपण शेवटपर्यंत ते प्रेम विसरू शकत नाही हे त्या चित्रपटातून फार चांगल्याप्रकारे दाखविण्यात आले आहे. मी जर चित्रपट समीक्षक असतो तर नक्कीच मितवाला 5 मानांकन दिले असते.
Comments
Post a Comment