Posts

Showing posts from October, 2026

पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा..!

Image
पहाटेच्या पाणीपुरवठ्यापासून विजेच्या लपंडावापर्यंत; जळगावकरांच्या ‘थेंबा-थेंबाच्या’ नियोजनाचा प्रश्न चेतन वाणी । महाराष्ट्रात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आतापासूनच पारा वाढू लागल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदी-नाले कोरडे पडत आहेत, अनेक ठिकाणी पाणीकपात सुरू झाली आहे. पण आजचा मुद्दा थोडा वेगळा आहे…      जळगाव शहरातही पाणी कपात करण्यात आली आहे. आमच्या परिसरातील म्हणजेच प्रभाग क्रमांक ५ मधील शनिपेठ-काट्याफैल भागात पाणीपुरवठा सध्या पहाटे ५ वाजता सुरू होतो. पूर्वी तर पहाटे साडेतीन वाजताच नळाला पाणी यायचे. म्हणजे झोप गेली उडत!      सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र त्याचवेळी पाणीपुरवठ्याशी संबंधित काही मूलभूत प्रश्नांकडेही पाहणे गरजेचे आहे.      अमृत योजना आल्यानंतर पाणी थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचणार, अशी मोठी वल्गना करण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही वल्गना अद्याप हवेतच विरल्याचे दिसते. पाण्याचा दाब आणि इमारतींची उंची यांचा ता...