प्यारी दीदी ‘अर्चना’ Happy Birthday My Loving Sis Archu...!
प्यारी दीदी ‘अर्चना’ Happy Birthday My Loving Sis Archu...!
माझी लाडकी लहान बहिण ‘अर्चना’ हिचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने लिहित असलेला ब्लॉग...अर्चनाचा जन्म 7 मार्च 1995 चा.. आज आपण "मुलगी झाली, लक्ष्मी आली" असे जरी गर्वाने सांगत असलो तरी मात्र नव्वदच्या शतकात मुलीचा जन्म झाल्यानंतर अनेकांच्या चेहर्यावर उदासी झळकायची. परंतु अर्चूचा जन्म झाल्यानंतर माझ्या कुटूंबियांनी तिचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी माझे बाबा देखील हयात होते. त्यांनीच तिला पहिल्यांदा झोळीत टाकले. जन्मापासूनच तब्येतीने सडपातळ असलेली 'अर्चू' वर्षभराची झाल्यानंतरही तिला फारसे चालता येत नव्हते. त्यामुळे आप्पा-अम्मी अधिकच चिंतातूर झाले. डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर ती तब्येतीने सडपातळ असल्याने उशिरा चालायला लागेल असे निदान केले. आमच्या परिवारात सर्वात लहान असल्याने अर्चू सर्वांचीच लाडकी होती. लहान असताना लवकर चालत नसल्याने मी व माझ्या काकांची मुलगी दक्षता आम्ही दोघे तिला रोज हात धरून पायी काही अंतर फिरवू लागलो. काही महिन्यातच अर्चू इतरांप्रमाणे चालू आणि धावू लागली. तिला तो निरागस चेहरा, अल्लडपणा पाहून सर्वांच्याच आनंदाचा पारा गगनाला भिडला.
लहानपणापासूनच तिला अभ्यासाचा लळा होता. त्यामुळे मीच एक दिवस पुढाकार घेवून तिला घराजवळच असलेल्या मनपाच्या शाळा क्रमांक 28 मध्ये घेवून गेलो. त्याठिकाणी पहिल्या बालवाडीसाठी तिचे नाव दाखल करून शिक्षणासाठी तिला बसविले. सर्वांची लाडकी असलेल्या अर्चूचा 5वा वाढदिवस आम्ही सर्वांनी जल्लोषात साजरा केला.
आज बघता बघता अर्चना 21 वर्षांची झाली. माझ्यापेक्षा नेहमीच अभ्यासात अव्वल असल्याने ती आजही माझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच असते. पैशांची नेहमी काटकसर, साधारण राहणीमान, चिमुकल्यांचा लळा, मोठ्यांचा आदर अशी आमची अर्चू... तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे असंख्य मैत्रिणी तिने काही वर्षातच जोडल्या.
मी आणि ती नेहमी भांडण करीत असतो. घरात असताना काही ना काही कारणावरून भांडणे आमची नित्याचीच.. लहानपणीतर एकदा तिने संतापात मला मोठा चमचा मारला त्याची खूण आज आहे. भांडणे तर प्रत्येक भाऊ-बहिणीमध्ये होतात त्याचप्रमाणे आमचीही भांडणे होतात आणि काही मिनीटांतच आम्ही पहिल्याप्रमाणे गोड होतो. अर्चू पप्पांची लाडकी तर मी आईचा लाडका.. लहान असूनही अभ्यासात मला मदत, कामात आईला मदत करण्यात ती कायमच अग्रेसर असते.
भाऊबीज, रक्षाबंधनला हक्काने हवी ती भेटवस्तू घेण्यात तिचा कायमच अट्टहास असतो. नेहमी होळीच्या जवळपासच तिचा वाढदिवस येत असतो. आज तर कमालच झाली तब्बल 12 वर्षांनी योग येत असलेल्या सोमवती महाशिवरात्रीला तिचा वाढदिवस आला. सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर तिने तयारी आटोपली. त्यानंतर 10:30 वाजता घरासमोरच असलेल्या श्री गुरूदत्ताच्या मंदिरात जावून मनोभावे आरती केली. यावेळी आम्ही सर्व उपस्थितांना उपवासामुळे वेफर आणि राजगिर्याचे लाडू प्रसाद म्हणून वाटप केले. धार्मिकतेचे बाळकडू आई-वडिलांकडूनच मिळाले असल्याने कुठेही बाहेर जावून पार्टी करण्याऐवजी महाशिवरात्रीचे औचित्य साधत श्री स्वामी समर्थांचे पाठ वाचन आणि श्री शिवशंकराच्या पिंडीचा अभिषेक करण्यासाठी ती बसली..
Comments
Post a Comment