शहरात आज शिवसेनेचा मेळावा फार उत्सवात पार पडला पण त्यात काही हास्यास्पद आणि गंभीर मुद्दे मांडण्यात आले. माझा तसा कोणत्याही पक्षाची बाजू घेण्याचा किंवा कोणतीही टीका घेण्याचा मुळीच हेतू नाही.
मेळाव्यामध्ये आ. सुरेशदादा जैन यांनी ए राजा व सुरेश कलमाडी यांच्यापेक्षा लहान घोटाळा केला व पोलिसांकडे त्या विरुद्ध कागदोपत्री पुरावा नाही असे सांगून आ. जैन यांच्या समर्थनार्थ लोकशाही पद्धतीने मूक मोर्चा काढण्यात आला त्याचा पुरावा दर वेळी न्यायालयात दिला जातो असे एका पदाधिकारी ने सांगितले. पण, माझ्या मते आ. जैन यांनी प्रशासनावर दबाव टाकून काही तपास अधिकारीना धमकी दिली होती तशी पोलिसात नोंद पण आहे. त्यांनी प्रशासनालाच आव्हान दिल्याने ते शिक्षा भोगत आहेत, त्या उलट ए राजा व कलमाडी यांनी या प्रकारे आव्हान दिले नव्हते. तसेच जर पोलीसांनकडे कागदोपत्री पुरावे नसते तर न्यायालयाने पण जैन यांना जमीन दिला असता. आ. जैन यांनी शहराचा खूप विकास केला ? आणि शहरात शांतता कायम ठेवली. यामुळेच जनता त्यांची आठवण करते आणि जनतेला त्यांची कमतरता भासत आहे.
मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्ह्यात दोन गट असल्याचेही सांगण्यात आले. या खुलास्यामध्ये माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर गेले व आ. संजय सावकारे पालकमंत्री झाले. यावरून तथ्य आढळून येते. या फेरबदला नंतर कार्यकर्ते पण विभागले गेले. संपूर्ण मेळाव्यामध्ये भाजपावर खूप टीका करून लोकसभेची एक जागा मिळवावी अशी मागणी करण्यात आली. पण जर त्या अगोदर महानगरपालिकेवर झेंडा लावल्यानंतर जर ती जागा मागितली तर ठोस टीका करून जागा हमखास मिळेल असे मला वाटते. यावेळी एका हि नेत्याने मनसे व कॉंग्रेसवर खंबीर टीका केली असे मला तरी काही आठवत नाही. या मागचे राजकारण वरिष्ठ नेत्यांनाच माहित?
………असो आज मेळाव्यात शहराचा एकही पदाधिकारी व्यासपीठावर दिसला नाही म्हणून खरे रूप व कार्यकर्त्यांचा उत्साह महानगरपालिका निवडणुकीच्या काळात दिसेल. तरीही काही चुकले असेल तर क्षमस्व:

Comments
Post a Comment