Posts

खबरदार : ऑनलाईन गेम्स नव्हे व्यसन?

Image
खबरदार : ऑनलाईन गेम्स नव्हे व्यसन? सध्याच्या युगात मोबाईल जगात खूप मोठी क्रांती झाली असून दररोज नवनवीन मोबाईल बाजारात येत आहेत. मोबाईलसोबतच नवीन गेम्स पण उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यापासून तीनपत्ती आणि क्यांडी क्रश सागा या गेम्सची नावे कानावर पडत असल्याने मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये तीनपत्ती गेम डाऊनलोड केला. परंतु त्यामुळे माझा दररोज कमीत कमी २ तास वेळ वाया जात होता. त्यातच आठ दिवसांपासून व्हात्स अप वर एक संदेश येत असून मोबाईलमध्ये वापर करण्यात येणारे गेम्स हे विदेशात तयार करण्यात आले असून त्यात तरुणांना गुंतवून हिंदुस्तानला महासत्ता होण्यापासून रोखणे हा त्यांचा प्रमुख हेतू आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.  त्यामुळे मी तत्काळ  माझ्या मोबाईलमधून तो गेम डीलीट केला.  मित्रांनो आता तुमचं भविष्य  तुमच्या  हातात आहे…… 
होलिकोस्तव, रेन डान्सची काय गरज? देशात सर्वत्र साजरा होणारा सण होळी/धुलीवंदन/रंगपंचमी  अवघ्या ७ दिवसांवर येउन ठेपला असून तरुणाई नियोजन  मग्न आहे. परंतु गेल्या १५ दिवसात जिल्ह्यासह राज्यात झालेल्या गारपीटच्या नुकसानीचा विचार एकही तरुण करत नाही. त्यातच शासन हि आचारसंहितेचे कारण करून मदत जहिर करण्यास मागेपुढे पाहत आहे आणि राजकारणी आपले राजकारण खेळण्यात मश्गुल आहेत . जळगावात देखील काही मंडळ, ग्रुप, संस्था यांनी जल्लोषात होलीकोस्तव साजरा करण्याचे ठरविले असून त्यासाठी हजारो रुपये खर्चून डीजे, रेन डान्सची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरात जागोजागी बेनर्स लावले जात आहे. इकोफ्रेण्डली रंगपंचमी साजरी होत असल्याने अनेक राजकारणी देखील आर्थिक मदत करत आहेत.    वर्षातून एक दिवस साजऱ्या केल्या जाणार्या या सणाला एक वर्ष ब्रेक देऊन तेच हजारो रुपये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना  दिल्यास प्रत्येकाला अनमोल असा आशिर्वाद मिळेल आणि गरीबाच्या चेहर्यावर हास्याची एक लहर उमटेल.      मित्रांनो आपण आजच विचार करा आणि माझा हा संदेश सर्व तरुणांमध्ये पोहचवून स्वतासह का...

महाविद्यालयीन युवतींसाठी 'टाईमपास ' कितपत योग्य ?

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना सुगीचे दीवस आले असून हि मराठी माणसांसाठी एक अभिमानाचीच बाब आहे . नुकत्याच काही दिवसांपूर्वी येउन गेलेल्या 'दुनियादारी ' आणि आताच आलेल्या  'टाईमपास ' चित्रपटाने तर अवघ्या तरुणाईला वेड लावले असून प्रत्येकाच्या मनात प्रेमाचेच वारे वाहत आहेत. परंतु   'टाईमपास ' चित्रपटात एक गरीब अशिक्षित मुलाला एक श्रीमंत घरातील सुशिक्षित मुलीवर प्रेम करतांना दाखविण्यात आले असून तो तिच्या वडिलांचा अहंकार जिरविण्यासाठी 'साईबाबा व आईबाबांची शपथ' घेऊन तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचे ठरवून तिला आपल्या जाळ्यात अड्कावितो . मित्रांच्या डिचविन्यामुळे सुरु केलेले   'टाईमपास ' प्रेम केव्हाच खरे होते हे त्याला स्वतालाही काळात नाही . संपूर्ण  चित्रपटात नायिकेवर प्रेम करतांना नायक तिची खूप काळजी घेत तिला कोणतीही इजा करत नाही . परंतु  चित्रपटाबाहेरील जगात सर्व उलटच घडत असून गरीब, अशिक्षित कुटुंबातील व टारगट  मुलेही श्रीमंत सुशिक्षित मुलगी आपल्या जाळ्यात अडकविण्याचे स्वप्न (ध्येय ) ठरवूनच फिरत असून एखादी मुलगी आवडल्यास तिला...

आपले मत कोणत्याही पक्षाला न देत माणूस पाहून द्यावे…… !!!

        महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात आपल्या वकृत्व शैलीने तरुणांच्या मनावर चांगला ठसा मिळवला. नाशिक महानगरपालिकेवरही भाजपच्या सहाय्याने आपला झेंडा रोवला. कदाचित  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात आपली छाप उमटावी आणि आपल्याला एक हातही सत्ता मिळावी हेच त्यांचे उद्दिष्ट असावे म्हणून जळगाव मनपाच्या निवडणुकीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी निर्माण केलेल्या आम आदमी पार्टीने वेगळ्यापद्धतीने प्रचार करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. आपने कॉंग्रेसच्या मदतीने दिल्ली विधानसभा काबीज केल्यानंतर केजरीवाल यांना देश काबीज करण्याचे वेध लागले मग त्यासाठी ऐन २६ जानेवारीच्या काळात जनतेच्या सुरक्षेचे वाटोळे करीत रस्यावर आंदोलन केले. देशात गेल्या काही महिन्यापासून मोदी फिवर सुरु असल्याने राज ठाकरे यांनी देखील त्यांना अजाहीरपणे पाठींबा दिला पण काही दिवसांपूर्वी अचानक घुमजाव देखील केले. का...
शहरात आज शिवसेनेचा मेळावा फार उत्सवात पार पडला पण त्यात काही हास्यास्पद आणि गंभीर मुद्दे मांडण्यात आले. माझा तसा कोणत्याही पक्षाची बाजू  घेण्याचा किंवा कोणतीही टीका घेण्याचा मुळीच हेतू नाही. मेळाव्यामध्ये आ. सुरेशदादा जैन यांनी  ए राजा  व सुरेश कलमाडी यांच्यापेक्षा लहान घोटाळा केला व पोलिसांकडे त्या विरुद्ध कागदोपत्री पुरावा नाही असे सांगून आ. जैन यांच्या समर्थनार्थ लोकशाही पद्धतीने मूक मोर्चा काढण्यात आला त्याचा पुरावा दर वेळी न्यायालयात दिला जातो असे एका पदाधिकारी ने सांगितले. पण, माझ्या मते  आ. जैन यांनी प्रशासनावर दबाव टाकून काही तपास अधिकारीना धमकी दिली होती तशी पोलिसात नोंद पण आहे. त्यांनी प्रशासनालाच आव्हान दिल्याने ते शिक्षा भोगत आहेत, त्या उलट ए  राजा व कलमाडी यांनी या प्रकारे आव्हान दिले नव्हते.  तसेच जर पोलीसांनकडे कागदोपत्री पुरावे नसते तर न्यायालयाने पण जैन यांना जमीन दिला असता.  आ. जैन यांनी शहराचा खूप विकास केला ? आणि शहरात शांतता कायम ठेवली. यामुळेच  जनता त्यांची आठवण करते आणि जनतेला त्यांची कमतरता भासत आहे. मेळाव्यामध...
आज माझ्या एक मित्राने ब्लॉग तयार केला, तर मलाही माझे विचार म़ाडाय़ला व्यासपीठ असल्याचे लक्षात आल्याने मी देखील ब्लॉग केला। लवकरच तुम्हाला माझे विचार समजतील .