*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*
*आमचं भांडण स्वार्थासाठी..!* गेल्या अनेक वर्षांपासून कायम असलेली सेना-भाजप युती यावर्षी नाट्यमय घडामोडी होऊन तुटली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणाच केली. अवघे काही दिवस उलट नाही तोच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे वक्तव्य केले. केवळ आपलीच चर्चा मतदारांमध्ये रहावी या उद्देशाने भाजप-सेनेने भांडण केलं असल्याचे आता वाटतं आहे. गेल्या चार महिन्यापासून राज्यात निवडणुकीची चर्चा सुरु आहे. चर्चा तर सर्व करताय पण कुणाची..? आठवण करून बघा जरा, कोणत्या पक्षाचं नाव येतं ओठांवर? भाजप आणि शिवसेना दोनच नाव लक्षात येतात. का तर, गावात ज्याची चर्चा, त्याचेच नाव ओठी असते. तशीच गंमत सध्या आपल्याकडे आहे. भाजप आणि सेना युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यातच त्यांचा दिवस जात होता. त्यामुळे कोणतीही वृत्तवाहिनी सुरु करा किंवा वृत्तपत्र वाचा दोनच नावे समोर भाजप आणि सेना. अगोदर युती कायम राहणार असे सुतोवाच करून ‘पहले तुम, पहले तुम’ करीत...