राजकीय किंगमेकर 'भाऊ-दादां'ची भूमिका संशयास्पद!
राजकीय किंगमेकर 'भाऊ-दादां'ची भूमिका संशयास्पद! खडसे 'रावेर लोकसभा' मतदार संघात तर दादा '7 शिवाजीनगरा'त व्यस्त जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांची धामधूम सुरू असतांना एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाची सुरूवात ज्यांच्या नावाने होत होती ते किंगमेकर आ.एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन यांची सध्या असलेली राजकीय भूमिका संशयास्पद दिसत असल्याने अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्यात कोणतीही निवडणूक आल्यास किंवा एखादा राजकीय डाव खेळायचा असल्यास काही वर्षापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन यांचेच नाव आघाडीवर असायचे. जैन शक्यतो शहराच्या आणि ठराविक न.पा.च्या राजकारणात लक्ष घालायचे तर खडसे जिप, पंस, इतर न.पा.च्या निवडणुकांचे नियोजन करीत होते. राज्याच्या राजकारणातही या दोन किंगमेकरांची वेगळीच छबी होती. घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा जैन हे साडेचार वर्ष कारागृहात असल्याने राजकारणापासून लांबच राहिले. त्याच काळात युत...