संवेदनशील शनिपेठेत दिसली सामंजस्याची भूमिका : एकीकडे अजान सुरू, दुसरीकडे श्रीराम नामाचा गजर
केवळ जळगावात नव्हे तर यंदा देशभरात श्रीराम नवमी जल्लोषात साजरी केली जात आहे. मुस्लीम धर्मीयांचा पवित्र महिना रमजान नुकतेच सुरू झाला असून श्रीराम नवमीची धामधूम देखील याच पर्वात आली. महाराष्ट्रात श्रीराम नवमीपूर्वी पाळधी आणि छत्रपती संभाजी नगर या दोन ठिकाणी सामाजिक शांततेला गालबोट लागले आणि दंगल उसळली. मंगळवारी पाळधी येथे श्री सप्तशृंगी देवीची गडावर जाणारी पायी दिंडी जात असताना काही समाज कंटकांनी त्यावर दगडफेक केली. वाद वाढला आणि दंगल उसळली. प्रथमदर्शनी समोर आलेल्या माहितीनुसार रमजान महिन्यातील रात्री ८.३० वाजेची नमाज सुरू असताना बाहेर डी.जे. सुरू असल्याने काही लहान मुलांनी वाद घातला आणि दगडफेक सुरू झाली असे समजले. समाजकंटक समाजात सर्वत्र विखुरलेले असतात परंतु समाजातील ज्येष्ठांनी आणि देशाचे उद्याचे भविष्य समजल्या जाणाऱ्या तरुणाईने भान ठेवणे गरजेचे आहे. जळगावात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी एकदा मस्जिदजवळून जाताना वाद उसळला होता. त्यानंतर सार्वजनिक गणेश महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या भूमिकेमुळे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडते. दरवर्षीच नमाज अदा होत असताना मिर...