लफडेबाज कार्ट, डँशिंग गर्ल!
लफडेबाज कार्ट, डँशिंग गर्ल! भटक्याची भटकंती सुरु असतांना बाहेरगावी असलेल्या एका विवाहित मैत्रिणीचा फोन आला. कहा हो यार, मै जळगाव आयी हु, चलो मिलते है. गोलाणीच्या चहा कट्ट्यावर भेटायचं ठरलं. भटक्या पोहचला तिसर्या मजल्यावर.. चहाचा घोट घेत जुन्या आठवणींना उजाळा द्यायला सुरुवात झाली. घरचे कसे, कुणी जुने मित्र भेटतात कि नाही अशा आपुलकीच्या गप्पा झाल्यावर आपल्या जरा वेगळ्या गप्पा रंगल्या. गप्पांची मैफिल ऐन रंगात आलेली असताना एक मुलगी मोठ्याने ओरडत असल्याचे ऐकू आले. एका घोटात चहा घशाखाली उतरवून भटक्याने मैत्रिणीसह तिकडे लक्ष दिले. गोलानीच्या स्पर्धा परीक्षा क्लासेसजवळ शायनिंग मारत जात असलेल्या एका टारगट कार्ट्यावर चांगलीच खेकसत होती. नीट लक्ष दिल्यावर लक्षात आले कि, त्या तरुणाने तिची छेड काढलेली असल्याने ती त्याच्यावर संताप करत होती. ओ... तुझ्या घरी आई-बहिणी नाही का?, इकडे का.... करायला आला. नीच, कुत्रा.. अशा शिव्यांची लाखोलीच ती वाहत होती. पाहता पाहता बघ्यांची गर्दी जमू लागली. भर मार्केटमध्ये एक तरुणी तरुणाला चांगलाच धडा शिकवत असतांना ती केव्हा...