Posts

Showing posts from March, 2017

दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!

Image
दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!      महाराष्ट्र शासनाने महिलांच्या विकासासाठी नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी २०११ पासून राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच पदभार स्विकारलेल्या अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी अवघ्या काही महिन्यातच अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या या अभियानाविषयी जागतिक महिला दिनानिम्मित आर.विमला यांच्याकडून जाणून घेवूया सविस्तर माहिती..! अभियानाचा मुख्य उद्देश आणि स्वरूप    २०११ मध्ये केंद्र शासनाने जे वंचित आहेत अशा गोरगरीब जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा त्यासाठी या अभियानाची स्थापना केली. एकट्याने कोणतेही कार्य हाती घेतल्यास ते लवकर शक्य होत नाही, असा विचार करीत जास्तीत जास्त संस्था निर्माण करण्यावर शासनाने भर दिला. केंद्र शासनाने पंचसूत्री तर राज्यशासनाने दशसुत्री कार्यक्रमाची आखणी केली. त्यानुसार महिलांना एकत्र आणणे, त्यांची बैठक घेणे, बचतीची सवय...

अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’

Image
अडथळ्यांचा पर्वत सर करणारी ‘कविता’     बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास, वेळोवेळी मिळालेले धक्के, पदरी पडलेले नैराश्य यातून खचून न जाता स्वयंसिद्धा अभियानात आजवर लाखो मुलींना प्रशिक्षित करून स्वतःला सिद्ध करण्यायोग्य बनविणाऱ्या मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी कविता सुभाष नावंदे यांची ही यशकथा..!     कविता यांचे मूळ गाव आंबेजोगाई. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. घरात चार बहिणी, १ भाऊ असा परिवार. वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदलीमुळे परळी, पाटोदा, बीड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण  केले. वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण करताच लग्न झाले. बीपीएड, एमपीएडचे शिक्षण औरंगाबाद येथे घेतले. ‘ते’ सात दिवस पहिला संघर्ष     ८० च्या दशकात मुलींना फारसे शिक्षण घेऊ दिले जात नव्हते. कविता यांचे वडिल माणिकराव यांनी देखील त्यांना दहावीनंतर पुढे शिक्षण बंद असा आदेशच घरात दिला. आईने मस्का लावला, वडिलांच्या विनवण्या केल्या, मैत्रिणींच्या पालकांनी समजाविले परंतु ते काही ऐकत ...