Posts

Showing posts from October, 2016

खाकीतील सर्वसामान्य स्त्री 'मोक्षदा पाटील'(IPS)

Image
*खाकीतील सर्वसामान्य स्त्री 'मोक्षदा पाटील'(IPS)*         एरव्ही आपण एखाद्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याकडे पहिले असता अनेकांना तोराच जास्त असल्याचे जाणवते. त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी असेल तर अधिकच. त्या खाकी मागे ही एक सर्वसामान्य व्यक्ती असतो, याची फार कमी लोकांना जाणीव असते. अशाच आपल्या जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यातील एक सर्वसामान्य स्त्री बुधवारी फुले मार्केटला बघायला मिळाली.       लहानपणीच जळगावची काहीशी ओळख असलेल्या IPS मोक्षदा पाटील यांची जळगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी वर्णी लागली. काही महिन्यांपूर्वीच त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांनी जळगावच्या अपर पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळला. रोखठोक बोलणे, कामाचा असलेला अनुभव, काम करण्याची वेगळी कार्यशैली, शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे त्यांचा स्वभाव फारच कणखर असल्याचा समजच जळगावकरांनी केला.       माझी आणि मोक्षदा पाटील यांची बातम्यांसाठी नेहमीच भेट होते. परंतु आजवर गेल्या...

'एसपीं'कडून पोलिसांना एम.एस.धोनीच्या स्वरूपात 'दिवाळी भेट'

Image
जळगावातील ५०० वर पोलिसांनी घेतला 'एम.एस.धोनी'चा आनंद       राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून सण, उत्सव, परिवार विसरून सतत दक्ष राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देशभर गाजलेल्या एम.एस.धोनी हा चित्रपट दाखवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी नवा पायंडा निर्माण केला आहे. एकप्रकारे पोलिसांना हि दिवाळी भेट आहे. राज्यातील हा दुसराच उपक्रम आहे.       जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.सुपेकर नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. समाधान हेल्पलाईन, वाचनालय, जॉब, करियर मार्गदर्शन केंद्र, स्केटिंग ग्राउंड, कराटे प्रशिक्षण यासारखे विविध उपक्रम त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाल्यांसाठी सुरु केले आहेत.        सध्या देशात एम.एस.धोनी चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून चित्रपटाने चांगला गल्ला हि जमवला आहे. सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आल्यानंतर फुटबॉल गोलकीपर ते टीम इंडियाचा कर्णधार हा प्रवास पूर्ण करतांना महेंद्र धोनी याने किती कष्ट घेतले. टीसी असतांना घेतलेली मेहनत, आयुष्यात आलेले ख...