Posts

Showing posts from January, 2018

साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर

Image
साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर             तरसोद, नशिराबाद, मुराराखेडा(उजाळगाव), या तीन गावांच्या सिमेसमोर तरसोद शिवारात इ.स.1662 साली मोरेश्‍वर हणमंत देशमुख यांनी बांधलेल्या श्री क्षेत्र तरसोद गणपती मंदिर या जागृत देवस्थानाची पंचक्रोशीत ख्याती असून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी मंदिराला भेट देत असतात. प्रचाराचा नारळ वाहायचा असो की लग्नानंतरचे देवदर्शन असो जळगावकरांची पहिली वारी असते ती तरसोदच्या गणरायाच्या चरणी. असा आहे इतिहास  :            पद्मालयचे सिध्द पुरूष गोविंद महाराज व आळंदी देवीची येथील सिध्द पुरूष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तसेच नशिराबाद येथील शिव योगिराज झिपरू अण्णा महाराज हे मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी यायचे. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि नशिराबादचे परम पुज्य झिपरू अण्णा या तिघे महाविभूती नशिराबादच्या पश्‍चिमेला दोन कि.मी. अंतरावर असलेल्या ज्या चिंचेच्या महाकाय वृक्षाखाली असलेल्या गणपती मंदिराजवळ बसत तेच हे तरसोदच्या गणेशाचे मंदिर. शेगाव ये...