Posts

Showing posts from December, 2017

मनुष्या नको रे निर्दयी होवू..!

Image
भूतदया करा , प्राण्यांच्या भावनांची जाण ठेवा.                      ज नावरांप्रती माणुसकी दाखवा , प्राण्यांना होणाऱ्या त्रासाची जाण ठेवा. असे आपण बोलतो , ऐकतो मात्र खरंच तसं वागतो का ? काही दिवसांपूर्वी महामार्गावर वाहनांच्या चाकाखाली आल्याने चिरडलेले माकड , कुत्रा यांचे फोटो पाहिले. पाहताच क्षणी जिवाचा तळफळाट झाला. गेल्या आठवड्यातच एका माकडाला निर्दयीपणे मारत असलेल्या तिघांचा व्हिडीओ व्हायरल झाला , सर्वत्र संतापाची लाट उसळली. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांना अटक झाली , तेव्हा कुठे अनेकांच्या मनाला थोडी शांती लाभली. मनुष्य खरंच खूप निर्दयी होतोय का ? आज पुन्हा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.             आमच्या घराशेजारी असलेले एक कुटूंब शेतकरी आहे. त्यांच्याकडे असलेल्या दोन म्हशी घराजवळच बांधलेल्या असतात. काल परिसरातच राहणाऱ्या कुणीतरी घरातील खराब बुरशी लागलेले बुंदीचे लाडू एका म्हशीला खावू घातले. काही वेळातच म्हशीला त्रास होऊ लागला. बिचारी मूक प्राण...