*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू*
*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू* *‘क्रीएटिव्ह ग्रुप’ची धाव, ‘ब्लू डायमंड’ची ओशाळलेली माणुसकी, तत्पर असलेले ‘तेज’* मित्रांनो नुकतेच माझ्या परिवारावर एक मोठे संकट आले. पैशांपेक्षा माणुसकी महत्वाची असते हे आजवर आपण केवळ बोलतच आलोय परंतु, मी जळगाव शहरात परिस्थितीनुसार बदलत जाणाऱ्या व्यक्तींचे काही पैलू मी त्यादिवशी दोन तासात अनुभवले. माझ्या मदतीसाठी लागलीच धावून आलेल्या ‘क्रीएटिव्ह ग्रुप’ आणि लागलीच उपचार सुरु करणारे डॉ.तेजेंद्र चौधरी यांचे विशेष आभार मांडण्यासाठी हा ब्लॉग.... अरे हो, एक राहिलेच ..! माणुसकीपेक्षा पैसा श्रेष्ठ असलेले डॉ.‘ब्लू डायमंड’ यांचे मनापासून विशेष आभार...! गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास माझे वडील रविंद्र वाणी(आप्पा) यांना दुकानावर असतांना अचानक लकव्याचा सौम्य झटका आला. त्याचा परिस्थितीत त्यांनी मला फोन केला. मी घरी होतो त्याच अवस्थेत गाडी काढली आणि निघालो. दुचाकीवर असतांनाच ‘क्रीएटिव्ह ग्रुप’च्या दोन मित्रांना फोन केले, मी दुकानावर पोहचतो तोच ते देखील हजर होते. *तब्बल अर्धातास फिरफिर* ...