प्यारी दीदी ‘अर्चना’ Happy Birthday My Loving Sis Archu...!
प्यारी दीदी ‘अर्चना’ Happy Birthday My Loving Sis Archu...! माझी लाडकी लहान बहिण ‘अर्चना’ हिचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने लिहित असलेला ब्लॉग... अर्चनाचा जन्म 7 मार्च 1995 चा.. आज आपण "मुलगी झाली, लक्ष्मी आली" असे जरी गर्वाने सांगत असलो तरी मात्र नव्वदच्या शतकात मुलीचा जन्म झाल्यानंतर अनेकांच्या चेहर्यावर उदासी झळकायची. परंतु अर्चूचा जन्म झाल्यानंतर माझ्या कुटूंबियांनी तिचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी माझे बाबा देखील हयात होते. त्यांनीच तिला पहिल्यांदा झोळीत टाकले. जन्मापासूनच तब्येतीने सडपातळ असलेली 'अर्चू' वर्षभराची झाल्यानंतरही तिला फारसे चालता येत नव्हते. त्यामुळे आप्पा-अम्मी अधिकच चिंतातूर झाले. डॉक्टरांकडे तपासणी केल्यावर ती तब्येतीने सडपातळ असल्याने उशिरा चालायला लागेल असे निदान केले. आमच्या परिवारात सर्वात लहान असल्याने अर्चू सर्वांचीच लाडकी होती. लहान असताना लवकर चालत नसल्याने मी व माझ्या काकांची मुलगी दक्षता आम्ही दोघे तिला रोज हात धरून पायी काही अंतर फिरवू लागलो. काही महिन्यातच अर्चू इतरांप्र...