‘शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी सोशलमिडीयाचा उपयोग’
‘शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी सोशलमिडीयाचा उपयोग’ सोशलमिडीयाचा उपयोग चांगल्या प्रकारे होवू शकतो याचे उत्तम उदाहरण गेल्या काही दिवसापासून व्हॉटस्ऍपवर फिरत असलेल्या एका व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून आपल्याला पहावयास मिळत आहे. सध्या राज्यात सर्वत्र दृष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे. कितीही प्रयत्न केले तरी निर्सगापुढे मानव हतबल असतो हेच यावरून दिसून येते. दोन वर्षापूर्वी राज्यात पडलेला कोरडा दृष्काळ गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे बळीराजाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात दृष्काळी परिस्थिती निर्माण झाली असता सर्वाधिक नुकसान शेतकर्याचे होत असल्याने त्यांना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्येचा पर्याय अंगीकारावा लागतो. गेल्या काही वर्षात ऍड्रॉंईड मोबाईल प्रत्येकाच्या हातात आले असून मोबाईल नेटवर्क पुरविणार्या कंपन्यांनी इंटरनेटचे दरही कमी केलेले आहेत. लहानश्या पाड्यापासून मेट्रोसिटीतील बहुतांश व्यक्ती मोबाईलवर सोशलमिडीयाचा वापर करताना दिसून येत आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकर्याची असलेली व्यथ...