गुरू परंपरा आणि माझे मत
गुरू परंपरा आणि माझे मत वाणी समाजातील सध्या वैश्य, वळंजू या नावांनी ओळखल्या जाणार्या आपल्या समाजाला शाप देण्यात आला असल्याने अनेक वर्षापासून गुरू नव्हते. परंतु, सन 2004 पासून आपल्या समाजाला श्री संस्थान हळदीपुर शांताश्रम मठाधिपती परमपुज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामी गुरू म्हणून मिळाले. गुरू असल्यास समाजाचा विकास निश्चित होते असा आजवरचा अनुभव आहे. प्रत्येक समाजाला एक गुरू आहेत त्यामुळे आपल्या समाजालाही गुरू असावेत अशी धारणा अनेकांची झाली प्रामुख्याने आपल्या वडीलधार्यांनी यावर लागलीच विश्र्वास ठेवला. मुळात आपण वैश्यवाणी असल्याने आपल्याला गुरू नव्हते ही धारणाच चुकीची आहे. वैश्यवाणी हे इतर वाणी बांधवांपेक्षा वेगळे नसल्याने आपण त्यांच्याप्रमाणे 'संत तुकाराम' यांना आपले गुरू का मानले नाही. त्यांच्याप्रमाणे मोठ्याप्रमाणावर संत तुकाराम महाराज जयंती व तुकाराम बीजोत्सव का साजरा केला नाही असा प्रश्न मला पडतो. मुळात मी लहान असल्यापासून जळगावात मला संत तुकाराम हे आपले समाजगुरू आहेत हे माहितीच नव्हते परंतु मी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नंदुरबार येथे दंडपाणेश्र्व...