Posts

Showing posts from February, 2015
तू हि रे माझा मितवा  आपल्याकडे साजरा होत असलेला वेलेंटाइन विक  मूळ पाशात्या दिवस आहे परंतु प्रेमीयुगल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हे दिवस लपत छपत का असेना साजरे करतात. मी देखील गेल्या काही वर्षापासून वेलेंटाइन डे साजरे करत होतो मात्र यावर्षी मी कोणालातरी मिस करत होतो तरीही मी माझ्या मित्रांसोबत आनंद साजरा केला. आजच रिलीज झालेला मराठी चित्रपट 'मितवा' मित्रांसोबत पाहण्याचा बेत आखला होता पण काही कारणास्तव ते रद्द करावे लागले. प्रेमकथा त्यातच मराठी चित्रपट असल्याने मी चित्रपट पाहण्याचा विचार मनाशी पक्का केला व एकटाच चित्रपट पाहण्यासाठी गेलो. लव्हस्टोरी असल्याने चित्रपट पाहतांना माझ्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला परंतु यावेळी "ती" माझ्यासोबत नव्हती. "प्रेम" ही वाटते तेव्हढी सोपी गोष्ट नाही. मुळात प्रेम ही गोष्टच नाही ती एक अदृष्यशक्‍ती आहे दोन मने जुळविण्याची. आजकालची युवापिढी माझ्यासारखे तरूणी-तरूणी प्रेमाच्या जाळ्यात सहज ओढले जातात. काही दिवस प्रेमाच्या नावाखाली आणाभाका घेत मौजमजा केल्यानंतर वारंवार उडत असलेल्या खटक्‍यांमुळे त्यांना ते प्रेम नकोसे ...