शहरात आज शिवसेनेचा मेळावा फार उत्सवात पार पडला पण त्यात काही हास्यास्पद आणि गंभीर मुद्दे मांडण्यात आले. माझा तसा कोणत्याही पक्षाची बाजू घेण्याचा किंवा कोणतीही टीका घेण्याचा मुळीच हेतू नाही. मेळाव्यामध्ये आ. सुरेशदादा जैन यांनी ए राजा व सुरेश कलमाडी यांच्यापेक्षा लहान घोटाळा केला व पोलिसांकडे त्या विरुद्ध कागदोपत्री पुरावा नाही असे सांगून आ. जैन यांच्या समर्थनार्थ लोकशाही पद्धतीने मूक मोर्चा काढण्यात आला त्याचा पुरावा दर वेळी न्यायालयात दिला जातो असे एका पदाधिकारी ने सांगितले. पण, माझ्या मते आ. जैन यांनी प्रशासनावर दबाव टाकून काही तपास अधिकारीना धमकी दिली होती तशी पोलिसात नोंद पण आहे. त्यांनी प्रशासनालाच आव्हान दिल्याने ते शिक्षा भोगत आहेत, त्या उलट ए राजा व कलमाडी यांनी या प्रकारे आव्हान दिले नव्हते. तसेच जर पोलीसांनकडे कागदोपत्री पुरावे नसते तर न्यायालयाने पण जैन यांना जमीन दिला असता. आ. जैन यांनी शहराचा खूप विकास केला ? आणि शहरात शांतता कायम ठेवली. यामुळेच जनता त्यांची आठवण करते आणि जनतेला त्यांची कमतरता भासत आहे. मेळाव्यामध...
Posts
Showing posts from June, 2013