पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS)
पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS) चेतन वाणी - एखाद्या पत्रकाराने पोलिसाचे कौतुक करणे म्हणजे नवलच.. गावभरात पोलिसांविषयी ओरड होत असतांना आपण एखाद्या अधिकाऱ्याचे कौतूक करणे म्हणजे दुखावलेल्या आत्म्यांच्या आगीत तेल ओतण्यासारखेच काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत जळगाव जिल्हा तसा नशीबवानच ठरला आहे. जिल्ह्याला एक तपापासून लाभलेले जवळपास सर्वच अधिकारी एखादे व्यक्तिमत्व सोडले तर सर्वच चांगलेच होते. विशेषतः पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेच्या मनात निर्माण केलेली जागा एका मित्रापेक्षा कमी नाहीच. जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचा एक तपाचा नामफलक पाहिला तर महाराष्ट्रीयन आणि दक्षिणेतील अधिकारी असा संमिश्र राहिला आहे. गेल्या बारा वर्षात जिल्ह्याने ७ पोलीस अधीक्षक पाहिले. कुणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लकी ठरले तर कुणी पोलिसांनाच खाक्या दाखविला. कोरोना काळात लाभलेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे हे बहुतांश काळ जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. अनेक कार्...