Posts

Showing posts from June, 2014

खबरदार : ऑनलाईन गेम्स नव्हे व्यसन?

Image
खबरदार : ऑनलाईन गेम्स नव्हे व्यसन? सध्याच्या युगात मोबाईल जगात खूप मोठी क्रांती झाली असून दररोज नवनवीन मोबाईल बाजारात येत आहेत. मोबाईलसोबतच नवीन गेम्स पण उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यापासून तीनपत्ती आणि क्यांडी क्रश सागा या गेम्सची नावे कानावर पडत असल्याने मी सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये तीनपत्ती गेम डाऊनलोड केला. परंतु त्यामुळे माझा दररोज कमीत कमी २ तास वेळ वाया जात होता. त्यातच आठ दिवसांपासून व्हात्स अप वर एक संदेश येत असून मोबाईलमध्ये वापर करण्यात येणारे गेम्स हे विदेशात तयार करण्यात आले असून त्यात तरुणांना गुंतवून हिंदुस्तानला महासत्ता होण्यापासून रोखणे हा त्यांचा प्रमुख हेतू आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.  त्यामुळे मी तत्काळ  माझ्या मोबाईलमधून तो गेम डीलीट केला.  मित्रांनो आता तुमचं भविष्य  तुमच्या  हातात आहे……