होलिकोस्तव, रेन डान्सची काय गरज? देशात सर्वत्र साजरा होणारा सण होळी/धुलीवंदन/रंगपंचमी अवघ्या ७ दिवसांवर येउन ठेपला असून तरुणाई नियोजन मग्न आहे. परंतु गेल्या १५ दिवसात जिल्ह्यासह राज्यात झालेल्या गारपीटच्या नुकसानीचा विचार एकही तरुण करत नाही. त्यातच शासन हि आचारसंहितेचे कारण करून मदत जहिर करण्यास मागेपुढे पाहत आहे आणि राजकारणी आपले राजकारण खेळण्यात मश्गुल आहेत . जळगावात देखील काही मंडळ, ग्रुप, संस्था यांनी जल्लोषात होलीकोस्तव साजरा करण्याचे ठरविले असून त्यासाठी हजारो रुपये खर्चून डीजे, रेन डान्सची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरात जागोजागी बेनर्स लावले जात आहे. इकोफ्रेण्डली रंगपंचमी साजरी होत असल्याने अनेक राजकारणी देखील आर्थिक मदत करत आहेत. वर्षातून एक दिवस साजऱ्या केल्या जाणार्या या सणाला एक वर्ष ब्रेक देऊन तेच हजारो रुपये गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिल्यास प्रत्येकाला अनमोल असा आशिर्वाद मिळेल आणि गरीबाच्या चेहर्यावर हास्याची एक लहर उमटेल. मित्रांनो आपण आजच विचार करा आणि माझा हा संदेश सर्व तरुणांमध्ये पोहचवून स्वतासह का...
Posts
Showing posts from March, 2014